Who are the new faces of Modi's cabinet? S Jaishankar's story is astonishing
मोदींच्या मंत्रिमंडळात कोण आहेत हे नवे चेहरे? एस जयशंकर यांची वर्णी आश्चर्यचकित करणारी By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 12:03 PM2019-05-31T12:03:37+5:302019-05-31T12:08:36+5:30Join usJoin usNext एस जयशंकर एस जयशंकर हे 1977 च्या बॅचचे आयएफएस अधिकारी आहेत. सतत कुरघोड्या करणाऱ्या चीन सोबत संबंध सुधारणे आणि अमेरिकेसोबतचे संबंध मजबूत करण्यामध्ये यांची महत्वाची भुमिका आहे. डोकलाम विवादावेळीही जयशंकर यांची मध्यस्थी कामी आली होती. 2012 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी चीनला गेले होते, तेव्हा त्यांची भेट झाली होती. जयशंकर हे अनेक देशांसोबतच्या कूटनीतीमध्ये हिस्सा झालेले आहेत.प्रताप चंद्र सारांगी प्रताप चंद्र सारांगी बालासोरचे खासदार आहेत. त्यांना राज्यमंत्री बनविण्यात आले आहे. त्यांना ओडिशाचा मोदी म्हटले जाते. सायकलवरून प्रवास करणारे आणि कच्च्या घरामध्ये राहणारे सारंगी 2004 आणि 2009 मध्ये आमदार राहिलेले आहेत. त्यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र, हरले होते. कैलास चौधरी राज्यवर्धन सिंह, दीया कुमारी, हनुमान बेनिवाल यांच्यासारख्या चेहऱ्यांना मागे टाकत कैलास चौधरी मंत्री बनले आहेत. राजस्थानच्या बाड़मेरमधून ते संसदेवर निवडून गेले आहेत. मात्र, पाच महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते हरले होते. देबश्री चौधरी यंदाच्या निवडणुकीत पश्चिम बंगालने देशाचे लक्ष वेधून घेतले होते. तेथून माजी केंद्रीय मंत्री एसएस अहलूवालिया किंवा दिलीप घोष यांना मंत्री बनविण्याची शक्यता होती. मात्र, मोदींनी देबश्री चौधरी यांना संधी दिली आहे. त्या बंगालमध्ये भाजपाच्या महासचिव आहेत. 2014 मध्ये त्यांनी बर्धमान-दुर्गापुरमधून निवडणूक लढविली होती. मात्र, हरल्या होत्या. जी किशन रेड्डी तेलंगानाच्या सिकंदराबादमधून जी किशन रेड्डी लोकसभेवर पोहोचले आहेत. रेड्डी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आणि युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्षही राहिले आहेत. 5 महिन्यांपूर्वी त्यांना विधानसभेमध्ये पराभव पत्करावा लागला होता. व्ही मुरलीधरन लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविणारी भाजपा भलेही केरळमध्ये एकही जागा जिंकू शकली नसली तरीही तेथील वरिष्ठ नेते व्ही मुरलीधरन यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. मुरलीधरन महाराष्ट्रातून राज्यसभा खासदार आहेत. ते एबीव्हीपीशीही जोडलेले आहेत. रेणुका सिंह सरुता छत्तीसगढ़च्या सरगुजा मतदारसंघातून खासदार बनलेल्या रेणुका सिंह यांना मोदींच्या मंत्रिमंडळात जागा मिळाली आहे. त्या पहिल्यांदाच खासदार बनल्या आहेत. रेणुका या आदिवासींचा आक्रमक चेहरा आहेत.टॅग्स :नरेंद्र मोदी शपथविधीनरेंद्र मोदीpm modi swearing-in ceremonyNarendra Modi