Who was the designer of Taj Mahal 10 most common exam questions and their answers
ताजमहालचा डिझाइनर कोण होता? परीक्षेत विचारले जाणारे १० हटके प्रश्न आणि त्यांची उत्तरं... By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 03:41 PM2022-10-24T15:41:55+5:302022-10-24T15:56:25+5:30Join usJoin usNext देशात सरकारी नोकऱ्यांची वेगळीच क्रेझ आहे. यामागील कारण म्हणजे सरकारी नोकरीमध्ये अनेक फायदे उपलब्ध आहेत, जे तुम्हाला खाजगी नोकऱ्यांमध्ये मिळू शकत नाहीत. तसं सरकारी नोकरीमुळे कर्मचाऱ्याला नोकरीच्या सुरक्षेची हमी मिळते. जी खासगी नोकरीत सहसा दिसत नाही. यामुळे देशातील लाखो तरुण सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करताना दिसतात. त्यासाठी ते वर्षभर वेगवेगळ्या सरकारी परीक्षाही देतात. सरकारी परीक्षा देणाऱ्या तरुणांना एक गोष्ट नक्की माहीत असते आणि ती म्हणजे सामान्य ज्ञान हा कोणत्याही अभ्यासक्रमाचा भाग असतो. लेखी परीक्षेपासून मुलाखतीपर्यंत उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या विविध स्तरांवर सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. जर तुम्ही सामान्य ज्ञानाचे प्रश्न नीट तयार केले असतील तर तुम्हाला परीक्षा उत्तीर्ण होण्यात फारशी अडचण येणार नाही. जवळपास प्रत्येक परीक्षेत सामान्य ज्ञानाचे प्रश्न नक्कीच विचारले जातात. GK चे प्रश्न एकदा लक्षात ठेवले तर ते कुठेतरी नक्कीच उपयोगी पडतील. असेच काही टॉप 10 प्रश्न आणि त्यांची उत्तरे जाणून घेऊया.प्रश्न- भारताच्या संसद भवनाचे शिल्पकार कोण होते? उत्तर- एडविन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकरप्रश्न- चंदीगड शहराचे मुख्य शिल्पकार कोण होते? उत्तर-फ्रेंच वास्तुविशारद Le Corbusier यांनी शहराची रचना केली.प्रश्न- दिल्लीतील प्रसिद्ध लोटस टेंपलचे शिल्पकार कोण होते? उत्तर- फरीबोर्ज साहिबा हे लोटस मंदिराचे शिल्पकार होते.प्रश्न- मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये भारत भवन कुणी साकारलं? उत्तर- नॉर्थ चार्ल्स कोरिआने भारत भवनचं डिझाइन साकारलं होतं. प्रश्न- स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार कोण आहेत? उत्तर- राम व्ही सुतार हे स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार आहेत.प्रश्न- पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे असलेल्या व्हिक्टोरिया मेमोरियलचे शिल्पकार कोण होते? उत्तर- ब्रिटिश वास्तुविशारद विल्यम इमर्सन हे व्हिक्टोरिया मेमोरियलचे शिल्पकार होते.प्रश्न- 'चलो दिल्ली'चा नारा कोणी दिला? उत्तर- सुभाषचंद्र बोस यांनी 'चलो दिल्ली'चा नारा दिला.प्रश्न- भारताचे पहिले व्हाईसरॉय कोण होते? उत्तर- लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हाईसरॉय होते.प्रश्न- जगातील सर्वात जास्त कोळसा उत्पादक कोणता देश आहे? उत्तर- चीन हा जगातील सर्वात मोठा कोळसा उत्पादक देश आहे.प्रश्न- ताजमहालचं डिझाइन कोणी केलं होतं? उत्तर- जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालचं डिझाइन उस्ताद अहमद लाहोरी यांनी केलं होतं.टॅग्स :ताजमहालशिक्षणशिक्षण क्षेत्रTaj MahalEducationEducation Sector