Why are there different colors on the stones that show the distance of a place?
एखाद्या ठिकाणांचं अंतर दाखवणाऱ्या दगडांवर का असतात वेगवेगळे रंग? By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 10:46 PM2019-08-14T22:46:08+5:302019-08-14T22:55:18+5:30Join usJoin usNext रस्त्याच्या कडेला असलेले 'माइल स्टोन' म्हणजेच मैलाचे दगड तुम्ही अनेकदा पाहिले असतील. या दगडांवर एखाद्या ठिकाणाचं अंतर आणि त्या ठिकाणाचं नाव दिलेलं असतं. या दगडांच्या वरच्या भागाला पिवळा, हिरवा, काळा, निळा आणि केशरी रंग दिलेला असतो. तर दगडाच्या खालच्या भागाला पांढरा रंग दिलेला असतो. रस्त्यावरून प्रवास करत असताना एखाद्या ठिकाणाचं अंतर पिवळ्या रंगाच्या दगडावर दाखवण्यात येते. ज्या दगडाच्या वरच्या भागाला पिवळा रंग दिलेला असतो. रस्त्यावरून प्रवास करत असताना अशा प्रकारच्या पिवळ्या रंगाचा दगड दिसल्यास नॅशनल हायवे म्हणजेच राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत असल्याचं समजून जावं. रस्त्यावरून प्रवासादरम्यान तुम्हाला हिरव्या रंगाचा माइलस्टोन दिसल्यास तुम्ही राष्ट्रीय महामार्गावर नाही तर राज्य महामार्गावर प्रवास करत आहात. तसेच तुम्हाला जर रस्त्याच्या कडेला केशरी रंगाची पट्टी असलेला माइल स्टोन दिसला तर समजा की, तुम्ही एखाद्या गावात आलात किंवा गावाच्या रस्त्याने प्रवास करत आहात. अनेकदा तुम्ही माइल स्टोनच्या वरच्या भागाला काळा किंवा निळा रंग दिलेला पाहिला असेल. हा रंग दिसला तर समजा की, तुम्ही एखाद्या मोठ्या शहरात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आला आहात.