...म्हणूनच श्रीमंत भारतीय आपला देश सोडून जाताहेत? जाणून घ्या पाच कारणे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 11:16 AM2024-06-28T11:16:33+5:302024-06-28T11:24:21+5:30

दुबई मालमत्ता बाजार म्हणून उदयास आले आहे. अतिश्रीमंत भारतीय तिकडे आकर्षित होत आहेत.

भारतातील अतिश्रीमंत लोक देश सोडून जात असून, प्रामुख्याने संयुक्त अरब आमिरातीला स्थायिक होत आहेत, असे ‘हेन्ले अँड पार्टनर्स’ने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.

२०२३ मध्ये ४,३०० अब्जाधीशांनी भारत सोडून दुबईत आश्रय घेतला असावा, असा अंदाज आहे.

अतिश्रीमंत भारतीय लोक देश सोडून का चालले आहेत, याची ५ कारणे समोर आली आहेत. याबाबत जाणून घेऊया.

१२० अब्ज डॉलर्स परदेशात राहत असलेल्या भारतीयांनी २०२३ मध्ये भारतात पाठविले आहेत.

६० अब्ज डॉलर्स मेक्सिकोला, चीनला ५० अब्ज डॉलर्स, फिलीपिन्सला ३९ अब्ज डॉलर्स, पाकिस्तानला २७ अब्ज डॉलर्स पाठविण्यात आले आहेत.

दुबई मालमत्ता बाजार म्हणून उदयास आले आहे. अतिश्रीमंत भारतीय तिकडे आकर्षित होत आहेत. एकूण विकलेल्या घरांपैकी ४० टक्के घरे भारतीयांनी खरेदी केली आहेत.

यूएई हा करमुक्त देश आहे. तेथे कोणताही वैयक्तिक आयकर भरावा लागत नाही. त्यामुळे अतिश्रीमंतांसाठी हा देश स्वर्गच ठरला आहे.

यूएईने २०२२ मध्ये आपली ‘गोल्डन व्हिसा’ योजना विस्तारित करून व्यावसायिक, कुशल कामगार, शास्त्रज्ञ आणि संशोधकांना विशेष लाभासह वास्तव्याची सुविधा दिली आहे.

दुबईत शिक्षण, आरोग्य, शॉपिंग सुविधा तसेच रस्ते व अन्य नागरी सुविधा अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या आहेत. उच्चभ्रू वर्गाला त्याची भुरळ पडते.

यूएईमध्ये तंत्रज्ञान व्यावसायिक आणि स्टार्टअप यांच्यासाठी अत्यंत पूरक धोरणे आहेत. त्यामुळे ही क्षेत्रे तेथे भरभराटीला आली आहेत. त्यामुळे भारतीय तिकडे आकर्षित होत आहेत.