Women decide where to spend money not men number of women dealing in money increased
पैसा कुठे खर्च करायचा हे पुरुष नाही महिलाच ठरवितात! पैशांचे व्यवहार करणाऱ्या महिलांची संख्या वाढली By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 08:29 AM2022-08-23T08:29:07+5:302022-08-23T08:38:07+5:30Join usJoin usNext देशातील महिलांमध्ये शिक्षणामुळे आत्मविश्वास वाढला असून, त्या पैसा नेमका कुठे आणि कसा वापरायचा याचा निर्णय स्वत: घेत असल्याचे समोर आले आहे. याचवेळी महिलांच्या बँक अथवा बचत खात्यांचे प्रमाणही वाढले असून, त्या मोबाईलवरून आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर करीत आहेत.केंद्राच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अहवालानुसार... देशातील निम्म्या महिला (५१ टक्के) पैसे कुठे आणि कसे वापरायचे याचा निर्णय घेतात. शहरी भागात हे प्रमाण ५७ टक्के इतके आहे, तर ग्रामीण भागात हेच प्रमाण ४८ टक्के आहे. १५ ते १९ वर्षांतील केवळ ३५ टक्के मुली पैसे कुठे वापरायचे याचा निर्णय घेतात. मात्र, जसजसे वय वाढत जाते तसतसे महिलांच व्यवहारात आपला हक्क गाजवत असल्याचे दिसून येते.मोबाईलवरून कुणाचे किती आर्थिक व्यवहार? मोबाईल फोनवरून आर्थिक व्यवहार करणाऱ्या महिलांचे प्रमाण देशात २२.५ टक्क्यांवर पोहोचले आहे. ३१% शहरी भागात, तर १६.६% महिला आर्थिक व्यवहारांसाठी मोबाईलचा वापर करतात. यातही विवाह न झालेल्या मुली आघाडीवर आहेत. राज्यात मोबाईलवरून आर्थिक व्यवहार करणाऱ्या महिलांचे प्रमाण ४८.८%वर पोहोचले आहे.महिलांच्या कमाईवर कुणाचे नियंत्रण? विवाह झालेल्या महिलांच्या कमाईवर पतीचे १४ टक्के थेट नियंत्रण आहे, तर कमविलेल्या पैशांचे काय करायचे यावर १८ टक्के पत्नीचे नियंत्रण असते. देशातील ६७ टक्के पती आणि पत्नी हे दोघे एकत्र विचार करून कमाई कुठे खर्च करायची आणि गुंतवायची याचा निर्णय घेतात. पती आणि पत्नीशिवाय तिसऱ्या व्यक्तीचे महिलेच्या कमाईवर नियंत्रण असल्याने प्रमाण नगण्य (०.०६ %) आहे.नोकरी किती कुणाकडे? सध्या देशातील १५ ते ४९ वयोगटांतील केवळ ३२ टक्के महिलांना नोकरी आहे, तर १५ ते ४९ वयोगटांतील ९८ टक्के विवाहित पुरुषांना नोकरी आहे. लग्नानंतर महिलांच्या नोकरीत काही प्रमाणात घट झाल्याचेही आकडेवारीतून समोर आले आहे. रोजगारामुळे महिला कुटुंबाची आर्थिक घडी व्यवस्थित बसवीत असल्याचे अहवालात दिसून येते.निर्णय घेण्यात महिलांचा वाटा स्वतःचे आरोग्य ८१%, घरातील खरेदी ८०%, नातेवाइकांच्या घरी भेट ८१%, या तीनही निर्णयात सहभागी नसणे ११%केंद्राचा अहवाल ८०.९% शहरी महिलांकडे त्यांचे बँक अथवा बचत खाते आहे. ७७.४% ग्रामीण महिलांकडे त्यांचे बँक अथवा बचत खाते आहे. ५१.३% शहरी महिलांना कर्ज कसे घ्यायचे याबाबत माहिती आहे. ५५% ३०-४९ वर्षे वयाच्या महिला या मोठ्या प्रमाणात कर्ज घेतात. ५४.४% महाराष्ट्रातील महिला आर्थिक व्यवहार सांभाळतात. ७१% महिला त्यांना मोबाईलवरील मेसेज वाचू शकतातमालमत्तेची मालकी कुणाकडे? स्वत:चे घर- महिला ४२ टक्के आणि पुरूष ६० टक्के स्वत:ची जमीन- महिला ३२ टक्के आणि पुरूष ४२ टक्केटॅग्स :महिलाWomen