World heritage sites in mumbai
‘जागतिक वारसा’ लाभलेली भारतातील काही नयनरम्य स्थळे By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 05:45 PM2018-04-18T17:45:24+5:302018-04-18T17:46:49+5:30Join usJoin usNext ज्या स्थळांना भौगोलिकदृष्ट्या प्रतिष्ठा व महत्व लाभलं आहे अशी स्थळे जागतिक वारसा स्थळे म्हणून ओळखली जातात. युनेस्कोने अशा स्थळांची यादी तयार करून त्या स्थळांच्या संवर्धनाची व संरक्षणाची जबाबदारी घेतली. आज ‘जागतिक वारसा दिना’निमित्त भारतातील अशीच काही जागतिक वारसा लाभलेली स्थळे आपण पाहणार आहोत. १) काझीरंगा (आसाम) – युनेस्कोने १९८५ साली काझीरंगा अभयारण्याला अद्वितीय नैसर्गिक पर्यावरणाचा दर्जा दिला आहे. या ४२,९९६ हेक्टर्सच्या भागात नैसर्गिक पर्यावरणासोबतच दुर्मिळ प्रजातींचे प्राणीही इथे पाहायला मिळतात. २) महाबोधी मंदिर ( बिहार) – बिहारमधील या प्रसिद्ध मंदिराला युनेस्कोने सर्वात महत्वाची सांस्कृतिक व पुरातन वास्तू म्हणून संबोधलं आहे. सम्राट अशोकाच्या काळात बांधलेल्या या वास्तूमुळे भारतीय वास्तूशैलीची नव्याने ओळख निर्माण झाली. ३) गोव्यातील चर्च – १६ ते १८ व्या शतकादरम्यान गोव्यात पोर्तुगीजांनी बांधलेल्या अशा अद्वितीय वास्तूंना जागतिक महत्व आहे. १९८६ साली युनेस्कोने गोव्यातील सर्व चर्चला जागतिक वारसा स्थळ म्हणून संबोधलं. ४) हंपी (कर्नाटक) – कर्नाटकमधील तुंगभद्रा नदीच्या किनारी असलेल्या हंपी येथील स्मारकांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. हंपी हे हिंदू आणि जैन धर्मियांसाठी महत्वाचं ठिकाण मानलं जातं ५) अजंठा वेरूळ लेणी (महाराष्ट्र) – महाराष्ट्रातील पर्यटकांच्या आवडीचं व युनेस्कोच्या यादीत जागतिक सांस्कृतिक श्रेत्र म्हणून ओळख असलेलं ठिकाण म्हणजे अजिंठा-वेरूळ लेणी. बौद्ध संस्कृतीच्या छटा असलेल्या या ठिकाणाला जागतिक वारसा लाभलेला आहे. ६) छत्रपती शिवाजी टर्मिनस (मुंबई) – मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस हे सर्वात जुनं व ऐतिहासिक वारसा लाभलेलं ठिकाण आहे. १८८७ साली बांधण्यात आलेलं हे स्टेशन जागतिक वारसा लाभलेल्या ठिकाणांमध्ये सर्वात प्रचलित आहे. ७) भीमबेटका (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील भीमबेटका येथे नैसर्गिक दगडी गुहा असून त्यावर पुरातन काळात केलेली चित्रकला दिसून येते. म्हणून युनेस्कोनं या ठिकाणांना अद्भूत सांस्कृतिक वास्तूचा दर्जा दिला. ८) दार्जिलिंग हिमालय रेल्वे (पश्चिम बंगाल) – दार्जिलिंग हिमालय रेल्वे, निलगिरी पर्वत रेल्वे आणि कलका शिमला रेल्वे या रेल्वेंना युनेस्कोतर्फे जागतिक वारसा स्थळाचा वारसा लाभला आहे. ९) पश्चिमी घाट – पश्चिमी घाटात सर्वात जास्त जैवविविधता आहे. या पर्वतांमध्ये तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही भागाचा समावेश होतो. १०) ताज महाल (उत्तर प्रदेश) – जगातील ७ आश्चर्यांमध्ये ताजमहालचा समावेश होतो. शाहजाहनने त्यांची पत्नी मुमताजसाठी १६३१ साली हि वास्तू बांधली होती. ऐतिहासिक वास्तू व दुर्मिळ मुघल बांधकामामुळे युनेस्कोने ताजमहालचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश केलाय.टॅग्स :प्रवासमुंबईमहाराष्ट्रTravelMumbaiMaharashtra