Worldwide use of EVMs is only in 'these' countries
जगभरात फक्त 'या' देशांमध्ये होतो EVMचा वापर By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 02:30 PM2019-03-11T14:30:19+5:302019-03-11T14:45:39+5:30Join usJoin usNext भारतात लोकसभा निवडणूक 2019ची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्ष आपापल्या परीनं निवडणुकीची तयार करत आहेत. या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) महत्त्वपूर्ण आहेत. जगात भारत हा सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. चीनची लोकसंख्या भारतापेक्षा जास्त आहे. परंतु लोकशाही मानणारा नव्हे, तर कम्युनिस्ट देश आहे. भारतात पहिल्यांदा ईव्हीएमचा वापर 1982मध्ये केरळच्या पारूर विधानसभा क्षेत्रात झाला होता. दुसऱ्यांदा भारतात 1999मध्ये लोकसभा निवडणुकीत EVMचा वापर मर्यादित क्षेत्रात करण्यात आला होता. वर्ष 2004मधील लोकसभा निवडणुकीनंतर भारतातली प्रत्येक लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया ईव्हीएमद्वारे केली जाते. जगभरात 195 देश आहेत, परंतु त्यातील फक्त 20 देश निवडणुकीत ईव्हीएमचा वापर करतात. 20 देशांमधील 6 देशांमध्ये सुरुवातीपासून EVMद्वारे मतदान केलं जातं. ईव्हीएमचा वापर करणाऱ्या देशांमध्ये भारताशिवाय ब्राझील, फिलिपिन्स, बेल्जियम, एस्टोनिया, संयुक्त अरब अमिरात, व्हेनेझुएला, जॉर्डन, मालदीव, नामिबिया, नेपाळ, भूतान, इजिप्त सारख्या देशांचा समावेश आहे. बऱ्याचशा देशात ईव्हीएमच्या वापरावर बंदी घातली आहे. अशा देशांत जर्मनी, नेदरलँड, इटली आणि अमेरिकेचाही समावेश आहे. ईव्हीएमवर सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घालण्यात आली आहे. आयरलँडमध्ये ईव्हीएम बॅन आहे. नेदरलँडमध्ये 2006मध्ये यावर बंदी घालण्यात आली होती. 2009मध्ये जर्मनीच्या सर्वोच्च न्यायालयानं ईव्हीएम संवैधानिक असल्याचं सांगितलं होतं. इटलीनं निवडणूक प्रभावित होत असल्याचं कारण देत ईव्हीएमच्या वापराला मज्जाव केला आहे. या देशामध्ये बॅलेट पेपरच्या साहाय्यानं मतदान केलं जातं. इंग्लंड आणि फ्रान्समध्येही ईव्हीएमचा वापर होत नाही. भारतात ईव्हीएम मशिनचं निर्माणही केलं जातं. ईव्हीएम मशीन बंगळुरूतल्या भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड आणि दुसरे हैदराबादच्या इलेक्ट्रॉनिक कॉर्प ऑफ इंडियामध्ये तयार केली जाते. भारतनिर्मित ईव्हीएम मशीन खरेदीदारांमध्ये नेपाळ, नामीबिया, केन्या आणि भूतानचा समावेश आहे. भारतात पेपर ट्रेलची व्यवस्था केल्यास ईव्हीएमसंदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर तोडगा निघू शकेल. पेपर ट्रेलमध्ये मतदान केल्यानंतर एक प्रकारची चिठ्ठी दिली जाते. टॅग्स :लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019