वाह ताज! लवकरच पर्यटकांच्या संख्येवर येणार मर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 16:43 IST2018-01-04T16:32:04+5:302018-01-04T16:43:45+5:30

जगप्रसिद्ध ताज महाल परिसरात रोज फक्त ४0 हजार पर्यटकांना प्रवेश द्यायचा विचार पुरातत्व विभाग (एएसआय) करीत आहे.

पर्यटन हंगामात व अनेकदा ताज महालला भेट देणा-यांची संख्या ६० ते ७० हजाराच्या घरात असते.

पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे ताज महालच्या पायाला इजा पोहोचू शकते, असे एएसआयच्या अधिका-याने सांगितले.

ताज महालच्या भुयारी खोलीत प्रवेशासाठी तिकीट आकारणे आणि १५ वर्षांखालील मुलांना विनामूल्य प्रवेशाचाही विचार सुरू आहे.

जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताज महालबद्दल फक्त देशीच नव्हे परदेशी पर्यटकांनाही मोठे आकर्षण आहे.