Year Ender 2019: hashtags on Twitter, including # loksabhaelections2019, # chandrayaan2
Year Ender 2019 : ट्विटरवर #loksabhaelections2019, #chandrayaan2 यासह 'हे' हॅशटॅग जास्त चर्चेत By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 01:20 PM2019-12-12T13:20:34+5:302019-12-12T13:27:22+5:30Join usJoin usNext बघता बघता 2019 हे वर्ष संपायला आलय अन् 2020 हे नवं वर्ष जवळ येतय. पण, 2019 हे वर्ष अनेक चांगल्या-वाईट घटनांनी चर्चेत आलं. विशेष म्हणजे, सोशल मीडियामुळे सर्वांपर्यंत या घटना पोहोचल्या. यातच ट्विटर इंडियाने भारतात यंदा सर्वाधिक जास्त हॅशटॅग (#) कोणता वापरला, याची माहिती दिली आहे. यामध्ये लोकसभा, चांद्रयान, पुलवामा हल्ला, बालाकोटमधील सर्जिकल स्ट्राईक, जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि वर्ल्डकप यांसारखे मुद्दे चर्चेत राहिल्याचे म्हटले आहे. #loksabhaelections2019 हा सर्वाधिक जास्त ट्विट करण्यात आलेल्या हॅशटॅग यंदा ट्विटरवर पाहायला मिळाला. दुसऱ्या क्रमांकावर #chandrayaan2 हा हॅशटॅग आहे. क्रीडा विश्वात #cwc19 जास्तकरून ट्रेंडिगमध्ये राहिला. तिसऱ्या क्रमांकावर #pulwama आहे. चौथ्या क्रमांकावर #article370 आहे. मनोरंजन क्षेत्रात सर्वाधिक ज्यास्त रिट्विट तमीळ एंटरटेनमेंट इंडस्ट्रीच्या नावावर आहे. यासाठी #Bigil@ ट्रेंडिगमध्ये होता. #Diwal हा सुद्धा हॅशटग ट्विटरवर ट्रेंडिग राहिला आहे. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत #avengersendgame चा सुद्धा समावेश आहे. याशिवाय, #AyodhyaVerdict नवव्या क्रमांकावर राहिला आहे. दहाव्या क्रमांकावर #Edmubarak हा हॅशटॅग दिसून आला. टॅग्स :ट्विटरTwitter