Year Ender 2021: ख्रिसमसची सुटी एन्जॉय करण्यासाठी बाहेर पडताय? या पर्यटन स्थळांना सर्वाधिक पसंती By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 07:18 PM 2021-12-19T19:18:37+5:30 2021-12-19T19:27:31+5:30
Tourist destinations in India for December, Winter season: कोरोनामुळे गेली दोन वर्षे घरात बसून असलेल्या देशवासियांना आता पर्यटन खुणावू लागले आहे. संभाव्य तिसरी लाट येण्याआधी लोकांना आधीच्या दोन लाटांमधील ताण हलका करण्याची संधी आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे घरात बसून असलेल्या देशवासियांना आता पर्यटन खुणावू लागले आहे. अनेक तज्ज्ञांनी जानेवारी, फेब्रुवारीत देशात कोरोनाची ओमायक्रॉनमुळे तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ही लाट आली तर पुन्हा किमान सहा महिने घरात बसावे लागण्याची शक्यता आहे. यामुळे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी, ख्रिसमसच्या सुटीकाळात भारतातील पर्यटनस्थळे बहरू लागली आहेत.
गेल्या पावणे दोन वर्षांत देशवासिय लॉकडाऊन, निर्बंध आणि रोजगारामुळे कुठेही जाऊ शकले नव्हते. अनेकांचे पगार कापले गेले होते, तर अनेकांना रोजगार गमवावा लागला होता. पुन्हा घडी बसविण्यात या नागरिकांना कष्ट घ्यावे लागले होते, अनेकांना कमी पगाराच्या नोकऱ्या पत्कराव्या लागल्या. यामुळे दुसऱ्या लॉकडाऊनंतर बऱ्यापैकी त्यांच्या संसाराचा गाडा रुळावर आला आहे.
हा तणाव कमी करण्यासाठी आता देशवासिय पर्यटनस्थळांकडे जाऊ लागले आहेत. दोन वर्षांपासून निर्मनुष्य झालेल्या या पर्यटन स्थळांवर थंडीची चाहूल लागताच मोठी गर्दी उसळू लागली आहे.
मथुरा पर्वतांव्यतिरिक्त मथुरा, वृंदावन येथेही मोठ्या संख्येने पर्यटक पोहोचले. येथे लोकांनी केवळ भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरालाच भेट दिली नाही तर अनेक महिने घरात कैद असल्याचा ताण कमी केला आहे. पर्यटकांनी यमुना घाटावर वेळ घालवला. गोकुळ धाम, गोवर्धन पर्वत यासह अनेक मंदिरांना भेटी दिल्या.
ऋषिकेश बहुतेक पर्यटक धार्मिक स्थळांकडे वळले आहेत. लोकांनी प्रसिद्ध मंदिरे, धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. लोक उत्तराखंडमधील ऋषिकेशला पोहोचले. इथले लोक डोंगरातल्या शांत वातावरणाचा आनंद घेत आहेत. ट्रेकिंग, रिव्हर राफ्टिंग आणि कॅपिंगचा आनंद घेतला. गंगेत स्नानासोबतच मंदिरांना भेटी दिल्या.
नैनिताल प्रवास बंदी शिथिल केल्यावर अनेक महिने बंद असलेल्या नैनितालच्या बाजारपेठा पुन्हा एकदा गजबजल्या. नैनितालच्या शांत रस्त्यावर गर्दी आणि बाहेरील प्रवासी दिसू लागले.
शिमला हिमाचल प्रदेशातील शिमला हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. दरवर्षी हजारो पर्यटक शिमलाला भेट देतात. त्याचवेळी, कोरोनाच्या काळात शिमल्यात पर्यटकांच्या प्रवासावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, लॉकडाऊन उघडताच लोक पुन्हा एकदा शिमल्यात पोहोचले. बर्फाच्छादित मैदानात लोकांनी लॉकडाऊनचा ताण हलका केला.