बाबा रामदेवांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; अॅलोपॅथीनंतर आता ज्योतिषांवर साधला निशाणा! By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 02:51 PM 2021-06-02T14:51:11+5:30 2021-06-02T15:01:46+5:30
बाबा रामदेव म्हणाले, कुठल्याही ज्योतिषाने कोरोना येणार, असे सांगितले नाव्हते आणि यानंतर ब्लॅक फंगस येणार, असेही कुणी बोलले नाही. रामदेव एका योग शिबिरात बोलत होते. (Yog guru Baba Ramdev now comment on astrologers ) अॅलोपॅथीनंतर आता बाबा रामदेवांनी ज्योतिष शास्त्रावर निशाणा साधला आहे. सार्व मुहूर्त इश्वराने तयार केली आहेत. ज्योतिषी (Astrologer) काळ, घड्याळ आणि मुहूर्ताच्या नावावर फसवणूक करतात. हीदेखील संपूर्ण एक लाख कोटी रुपयांची इंडस्ट्री आहे, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.
बाबा रामदेव म्हणाले, ज्योतिषी बसल्या-बसल्याच नशीब सांगतात. मोदींनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या तेव्हा कुणालाही माहीत नव्हते.
बाबा रामदेव म्हणाले, कुठल्याही ज्योतिषाने कोरोना येणार, असे सांगितले नाव्हते आणि यानंतर ब्लॅक फंगस येणार, असेही कुणी बोलले नाही. रामदेव एका योग शिबिरात बोलत होते.
बाबा रामदेव म्हणाले, कोरोनावर बाबा रामदेव औषध आणतील, असेही कुणी सांगितले नव्हते. मी शुद्ध हिंदी आणि संस्कृत बोलतो. मधे-मधे इंग्रजी बोलणाऱ्यांनाही ठोकतो. कारण ते बोलत होते, की हिंदी आणि संस्कृत बोलणारे मोठे होऊ शकत नाहीत.
आता हिंदी आणि संस्कृत बोलणाऱ्याने, असे झेंडे रोवले आहेत, की सर्वच जण म्हणत आहेत, हिंदी शिकायला हवे, संस्कृत शिकायला हवे. ते म्हणाले, भविष्यात गुरुकुलात शिकणारे लोकच देश चालवतील. 20-25 वर्षांनंतर प्रयोग करून सांगेन.
पतंजलीनं माशावर केलं कोरोनिलचं परीक्षण - पतंजलीने उत्तराखंडमधील नद्यांमध्ये आढळणाऱ्या जेब्रा फिश नावाच्या माशांवर कोरोनिलचे परीक्षण केले आहे. आयएमए उत्तराखंडचे सचिव डॉ. अजय खन्ना यांनी हा दावा केला आहे.
ते म्हणाले, स्वतः पतंजलीने पायथॉमेडिसिन जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनात यासंदर्भात माहिती दिली आहे.
ते म्हणाले, नियमानुसार माशावर परीक्षण करण्यात आलेले औषध, माणसासाठी वापरले जाऊ शकत नाही. तसेच माशावरही व्यवस्थीत पणे परीक्षण करण्यात आलेले नाही, असेही ते म्हणाले.
माशाला कोरोना संक्रमित केल्यानंतरच कोरोनिल औषध द्यायला हवे होते. जेणे करून या औषधाचा व्हायरसवर काही परिणाम होतो, की नाही, हे स्पष्ट झाले असते. मात्र, तसे केले गेले नाही.
योग गुरू बाबा रामदेव...