योग गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीचे प्रोडक्ट आता मिळणार ऑनलाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 20:53 IST2018-01-16T20:32:27+5:302018-01-16T20:53:01+5:30

मुंबई- योग गुरू बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी मिळून पतंजलीचे प्रोडक्ट ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिले आहेत.

आता ग्राहकांना पतंजलीचे प्रोडक्ट अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉल, ग्रोफर्स आणि बिगबास्केटसह इतर ऑनलाइन पोर्टलवरून विकत घेता येणार आहेत.

या शिवाय पतंजलीचे प्रोडक्ट शॉपक्लूज व नेटमेड्स वरही मिळणार आहेत.

योग गुरू बाबा रामदेव व आचार्य बालकृष्ण यांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सच्या अधिकाऱ्यांसह पत्रकार परिषद घेतली.