You will be amazed to see India's largest bird idol in the world!
भारतात जगातल्या सर्वात मोठ्या पक्ष्याची मूर्ती, पाहून व्हाल थक्क! By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 03:28 PM2019-09-30T15:28:37+5:302019-09-30T15:33:27+5:30Join usJoin usNext रावणानं जेव्हा सीतेचं अपहरण केलं होतं, त्यावेळी तिला वाचवण्यासाठी जटायूनं प्राणांचं बलिदान दिलं होतं. असं म्हणतात, युद्धात पराभव झाल्यानंतर जटायूचे पंख रावणानं बांधले होते, त्यावेळी तो चादामंगलमच्या खोऱ्यात कोसळला होता. केरळमधल्या त्याच ठिकाणी चादामंगलम असं एक पार्क आणि पर्यटन केंद्र आहे. हे पर्यटनस्थळी समुद्र सपाटीपासून 350 मीटर(1200 फूट) उंचावर स्थित आहे. त्याच ठिकाणी जटायूची सर्वात भव्य मूर्ती तयार करण्यात आलेली आहे. जटायूची पक्ष्याची ही भव्य मूर्ती (200 फूट लांब, 150 फूट रुंद, 70 फूट उंच) पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. रावणाबरोबर झालेल्या युद्धात जटायूनं एका गुहेत आश्रय घेतला होता. एका गुहेचं एका रिसॉर्टमध्ये रूपांतर करण्यात आलं आहे. अनेक पर्यटकांसह रुग्णांना जटायूच्या कहाणीबरोबर आयुर्वेदिक उपचारही मिळणार आहेत.