लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणाचे हे किस्से वाचून तुम्हाला वाटेल अभिमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 15:45 IST2018-10-02T15:39:14+5:302018-10-02T15:45:18+5:30

देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची आज जयंती. लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या साधेपणा आणि शिष्टाचाराने भारतीय राजकारणात एक आदर्श निर्माण केला. जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनातील काही घटनांवर टाकलेला हा दृष्टीक्षेप.
शाळेत शिकत असताना शास्त्री यांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे नदीमध्ये पोहत ते शाळेत जात.
आजकालच्या सामान्य नेत्याकडेही वाहनांचा ताफा असतो. मात्र शास्त्रीजी सरकारी कारचासुद्धा वापर करत नसत. एकदा त्यांच्या मुलाने सरकारी कार वापरली. त्यामुळे दु:खी झालेल्या शास्त्रीजींनी किलोमीटरच्या हिशोबाने कारचे भाडे सरकारी तिजोरीत जमा केले.
आर्थिक परिस्थितीमुळे पत्नीसाठी महागडी साडी घेणे त्यांना शक्य झाले नाही. त्यावेळी मिलच्या मालकाने साडी भेट म्हणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र शास्त्रीजींनी ही भेट नाकारली.
जय जवान जय किसानचा अजरामर नारा लालबहादूर शास्त्री यांनीच दिला होता. त्यावेळी देशात अन्नधान्याची टंचाई होती. त्यामुळे आठवड्यातील एक दिवस उपवास करण्याचे आवाहन त्यांनी देशवासीयांना केले. तसेच स्वत:ही कुटुंबीयांसमवेत उपवासाचे व्रत पाळले.