अन् ३६३ दिवसांनी भरून निघाली तिची 'जखम'; Aryna Sabalenka अमेरिकन ओपनची नवी 'सम्राज्ञी'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 10:55 AM2024-09-08T10:55:05+5:302024-09-08T11:13:12+5:30

गतवर्षी अगदी असाच जुळून आला होता योग, पण...

अमेरिकन ओपन २०२४ स्पर्धेतील महिला गटातील एकेरीच्या फायनलमध्ये बेलारुसच्या आर्यना सबालेंका हिने बाजी मारली.

वर्षातील अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत तिने घरच्या मैदानात खेळणाऱ्या जेसिका पेगुला हिचे कडवे आव्हान परतवून लावले.

पहिल्यांदा ग्रँडस्लॅमची फायनल खेळणाऱ्या पेगुला हिने आर्यना सबालेंका हिला कडवी झुंज दिली. पण १ तास ५३ मिनिटे चाललेल्या खेळात फायनली महिला टेनिस जगतातील दुसऱ्या क्रमांकाच्या संबालेंकानं बाजी मारली.

आर्यना संबालेंका हिने याआधी तिने दोन वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. पण अमेरिकन ओपन स्पर्धेत ती पहिल्यांदाच चॅम्पियन ठरलीये.

२०२३ मध्ये तिनं आपल्या कारकिर्दीतील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत तिने फायनल मारली होती.

२०२४ या वर्षाची सुरुवातही तिने ग्रँडस्लॅमच्या जेतेपदाने केली होती. तिच्या नावे दोन ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपदाची नोंद आहे. वर्षाची दमदार सुरुवात करणाऱ्या आर्यना संबालेंकानं अमेरिकन ओपन स्पर्धेच्या जेतेपदासह वर्ष अविस्मरणीय केले आहे.

२०२४ या वर्षाची सुरुवातही तिने ग्रँडस्लॅमच्या जेतेपदाने केली होती. तिच्या नावे दोन ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपदाची नोंद आहे. वर्षाची दमदार सुरुवात करणाऱ्या आर्यना संबालेंकानं अमेरिकन ओपन स्पर्धेच्या जेतेपदासह वर्ष अविस्मरणीय केले आहे. २०१६ नंतर एका वर्षात ऑस्ट्रेलियन ओपन आणि अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकण्याचा विक्रम तिच्या नावे झाला आहे.

कमालीची गोष्ट म्हणजे गत वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनच्या रुपात पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली त्याच वर्षी म्हणजे २०२३ मध्येही ती अमेरिकन ओपनची फायनलही खेळली होती. कोको गॉफ विरुद्धचा तो पराभव दिला जखम देऊन गेला होता. आता तिची ही जखम ३६३ दिवसांनी भरून निघलीये.