Ballon d’Or 2024 : सर्वोत्तम स्ट्रायकर अन् गोली कोण ठरलं? इथं पाहा पुरस्कार विजेत्यांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 11:18 AM2024-10-29T11:18:49+5:302024-10-29T11:41:56+5:30

फुटबॉल जगतातील प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात सन्मान मिळालेल्या खेळाडू आणि कोचसंदर्भातील खास स्टोरी

मँचेस्टर सिटीकडून खेळणारा स्पॅनिश फुटबॉलपटू रॉड्री (Rodri) हा पुरुष गटात वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू ठरला आहे. या मिडफिल्डरनं २०२४ च्या बॅलन डी'ओर या प्रतिष्ठित पुरस्कारावर नाव कोरले. पहिल्यांदाच त्याने हा पुरस्कार पटकवला आहे.

महिला गटात ऐताना बोनमाटी (Aitana Bonmati ) हिने बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकला. स्पेनसह बार्सिलोना क्लबकडून ही महिला फुटबॉलर मिडफिल्डरच्या रुपातच खेळते.

२१ वर्षाखालील वयात सर्वोत्तम कामगिरीसाठी स्पॅनिश फुटबॉलपटू लामिने यामल (Lamine Yamal) याला कोपा ट्रॉफीसह सन्मानित करण्यात आले.

अर्जेंटिनाच्या इमिलिआनो मार्टिनेझ (Emiliano Martínez) याला सर्वोत्कृष्ट गोलीसाठी (गोलकिपर) दिली जाणारी यशिन ट्रॉफीसह गौरवण्यात आले.

इटलीचे कार्लो अँसेलोटी (Carlo Ancelotti) हे वर्षातील सर्वोत्तम कोच ठरले. जे रिअल मॅड्रिडचाही भाग आहेत.

महिला फुटबॉलमधील कोचिंगमध्य एम्मा कॅरोल हेस (Emma Hayes ) या सर्वोत्तम ठरल्या. त्या इंग्लंडसह चेल्साचा क्लबशी कनेक्टेड आहेत.

सर्वोत्तम स्ट्रायकरसाठी इंग्लंडच्या हॅरी केन (Harry Kane) आणि फान्सच्या किलियन एम्बापे (Kylian Mbappe) यांना गर्ड मुलर ट्रॉफीसह सन्मानित करण्यात आले.

पुरुष गटात रिअल मॅड्रिड क्लब वर्षातील सर्वोत्तम संघ ठरला.

महिला गटात एफसी बार्सिलोना वर्षातील सर्वोत्तम संघ ठरला.