Barbie honours gymnast Dipa Karmarkar with a special edition Barbie modelled after her
लहान माझी बाहुली... जिमनॅस्ट दीपा बार्बीच्या रूपात By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 03:04 PM2019-03-12T15:04:44+5:302019-03-12T15:08:17+5:30Join usJoin usNext रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या दीपा कर्माकरने भारताला जिमनॅस्टचे वेड लावलं. भारताची 'जिमनॅस्ट क्वीन' अशी तिची ओळख निर्माण झाली. तिच्यामुळे जिमनॅस्टीक या खेळाकडे गांभीर्यानं पाहिलं जाऊ लागलं. तिच्या या कामगिरीची दखल 'बार्बी डॉल' या प्रसिद्ध कंपनीनंही घेतली आणि त्यांनी चक्क दीपाच्या रूपाची बार्बी डॉल तयार केली आहे. 2014च्या राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकणाऱ्या दीपाला रिओत पदकानं हुलकावणी दिली असली तरी तिनं घेतलेली भरारी ही अनेकांना प्रेरणा देणारी ठरली. लाल रंगाचा जिमनॅस्टचा ड्रेस परिधान केलेली ही बाहुली हुबेहुब दीपासारखी दिसत आहे. दीपानं आतापर्यंत राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण 77 पदकांची कमाई केली आहेत आणि त्यात 67 सुवर्णपदकं आहेत. FIG आर्टिस्टीक जिमनॅस्टीक जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू आहे. दीपासह जपानची टेनिसपटू नाओमी ओसाका, ब्राझीलची सर्फर माया गॅबीएरा आणि कॅनडाची आईस स्केटर टेस्सा व्हर्च्यू यांचाही बार्बी डॉलनं गौरव केला आहे. दीपाने बार्बीसोबतचा फोटो सोशल मीडियावर नुकताच शेअर केला. बार्बी डॉल कंपनीनं त्यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्तानं दीपाला ही विशेष भेट दिली. टॅग्स :दीपा कर्माकरDipa Karmakar