ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ७ - भारतातील दिग्गज टेनिसपटू असलेल्या महेश भूपतीचा आज (७ जून) वाढदिवस.. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया भूपतीबद्दल काही खास गोष्टी...!- ७ जून १९७४ साली चेन्नईत जन्मलेला भूपती हा १९९०-२०००च्या दशकातील 'सर्वोत्तम डबल प्लेयर्स'पैकी एक मानला जायचा. १९९९ साली त्याने लिअँडर पेसच्या साथीने 'फ्रेंच ओपन' व ' विम्बल्डन'सह तीन स्पर्धांचे विजेतेपद पटकावले.- 'ग्रँड स्लॅम' टूर्नामेंट जिंकणारा भूपती हा पहिला भारतीय खेळाडू ठरला. १९९७ साली त्याने रिका हिराकीच्या साथीने ही टूर्नामेंट जिंकली होती. - जगभरातील अव्वल टेनिसपटूंपैकी एक असलेल्या राफेल नदालच्या मते त्याच्या (भूपती) स्ट्राँग बॅकहँड फटक्यांमुळेच तो सर्वोत्तम अॅड कोर्ट प्लेयर ठरतो. - २००८ साली त्याने 'ऑस्ट्रेलियन ओपन मिक्स्ड डबल्स' स्पर्धेचे जेतेपद मिळवून मिक्स डबल्समध्ये करीअर ग्रँड स्लॅम जिंकणा-या ८ टेनिसपटूंच्या यादीत स्थान मिळवले. - 'इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीग'चा भूपती संस्थापक आहे. - २००६ साली भूपतीने मार्टिना हिंगीससोबोत जोडी जमवत 'ऑस्ट्रेलिय ओपन ' स्पर्धेत प्रवेश केला आणि स्पर्धेचे विजेतेपदही पटकावले. त्यानंतर गेली अनेक वर्ष ते दोघे एकत्र खेळत असून त्यांनी अनेक स्पर्धांच्या विजेतेपदावर नावही कोरले आहे. - २००१ साली भारत सरकारने 'पद्मश्री' खिताब देऊन भूपतीचा गौरव केला.- १६ फेब्रुवारी २०११ साली भूपतीने मिस. युनिव्हर्स व अभिनेत्री लारा दत्ताशी लग्न केले. त्या दोघांना सायरा नावाची गोंडस मुलगीही आहे. भूपतीचे हे दुसरे लग्न, त्यापूर्वी २००३ साली त्याचा श्वेता जयशंकर हिच्याशी विवाह झाला होता मात्र २०१० साली त्यांनी घटस्फोट घेतला.