OMG : अंधविश्वासाच्या मर्यादा ओलांडल्या; सामन्यापूर्वी 'हा' खेळाडू करतो किळसवाणी गोष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 09:40 IST2020-05-26T09:37:03+5:302020-05-26T09:40:13+5:30

खेळ आणि अंधविश्वास यांचं एक वेगळच नातं आहे. मैदानावरील आपली कामगिरी चांगली व्हावी यासाठी खेळाडूंनी आपल्या मनाशी काही अंधविश्वास पक्के केले आहेत. त्यानुसारच ते सामन्याला सुरुवात करण्यापूर्वी काही तरी असे विचित्र करतात की ते पाहून लोकांनाही कधी कधी कसंतरी वाटतं.
पण, आज आपण अशा एका खेळाडूला भेटणार आहोत, की ज्यानं अंधविश्वासाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्याचा हा अंधविश्वास इतका किळसवाणा आहे, की त्याचे चाहतेही ती कृती करताना शंभर वेळा नक्की विचार करत असतील.
ब्राझिलचा मिस्क मार्शल आर्ट्सच्या ल्योतो मचिदा याच्याविषयी आपण बोलत आहोत. ल्योतोनं UFCच्या लाईटव्हेट गटाचे जेतेपद नावावर केले आहे. त्याशिवाय त्याच्या नावावर अनेक विक्रमही आहेत.
मिक्स मार्शल आर्ट्सच्या जगात ल्योतोचं नाव मोठमोठ्या खेळाडूंमध्ये घेतले जाते. ल्योतोनं कारकिर्दीत आतापर्यंत 35 पैकी 26 सामने जिंकले आहेत. त्यानं 11 सामन्यांत प्रतिस्पर्धीला नॉकआऊट केले आहे.
त्याच्या या मेहनतीमागे अथक परिश्रमही आहेत. त्याचा एक पंच प्रतिस्पर्धीला निष्प्रभ करून टाकणारा आहे.
पण, सामन्याला सुरुवात करण्यापूर्वी तो अशी एक गोष्ट करतो, की ती जाणून तुम्हाला धक्काच बसेल.
रिंगवर उतरण्यापूर्वी तो स्वतःची लघवी पितो... होय हे खरं आहे. त्यानं स्वतः एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
''गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःची लघवी पित आहे आणि त्यातून मला ताकद मिळते. त्यामुळेच रिंगमध्ये सर्वोत्तम कामगिरी करू शकतो,'' असे त्यानं सांगितले.
असा अंधविश्वास असणारा ल्योतो हा एकमेव खेळाडू नाही, तर मॅक्सिकोचा बॉक्सर ज्युआन मार्केजही तसंच करतो. तसेच मिक्स मार्शल आर्ट्सचा फायटर ल्यूक कमोही असंच करतो.