Captain Cool Anup Kumar retired
'कॅप्टन कूल' अनुप कुमार निवृत्त By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 11:59 AM2018-12-20T11:59:16+5:302018-12-20T12:02:14+5:30Join usJoin usNext भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार 'कॅप्टन कूल' अनुप कुमारने प्रो कबड्डी लीगमधून निवृत्ती जाहीर केली. हरयाणापासून 247 किलोमीटर दूर असलेल्या पार्ला गावात जन्मलेल्या अनुपने प्रो कबड्डी लीगमध्ये यू मुंबा आणि जयपूर पिंक पँथर्स संघाचे नेतृत्व सांभाळले आहे. 2018च्या मोसमात त्याला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याला 13 सामन्यांत 50 गुणांची कमाई करता आली, तर त्याच्या नेतृत्वाखाली जयपूरने 14 पैकी 4 सामने जिंकले. प्रो कबड्डीत त्याने एकूण 91 सामन्यांत 596 गुण कमावले आहेत आणि सर्वाधिक गुण करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो सहाव्या क्रमांकावर आहे. अनुपची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 2006 साली दक्षिण आशिया स्पर्धेपासून सुरुवात झाली. त्यानंतर तो सातत्याने भारतीय संघाचा सदस्य आहे. अनुपला 2012 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2016 मध्ये विश्वचषक जिंकला.टॅग्स :प्रो कबड्डी लीगकबड्डीPKL 2018Kabaddi