Commonwealth Games 2018 : सुशील कुमारचे सोनेरी यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 15:17 IST2018-04-12T15:17:45+5:302018-04-12T15:17:45+5:30

या विजयासह सुशीलनं ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. राष्ट्रकुल स्पर्धेत तीन सुवर्णपदकांची कमाई करणारा खेळाडू होण्याचा मान सुशीलनं पटकावला आहे.
उपांत्य लढतीत सुशील कुमारने पाकिस्तानच्या मोहम्मद असद बट्ट याला पराभूत करत पुरुषांच्या 74 किलो वजनी गटाची अंतिम फेरी गाठली होती.
दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता असलेला भारताचा आघाडीचा कुस्तीपटू सुशील कुमारने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
त्यानंतर अंतिम लढतीत सुशीलने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्नेस बोथाचा १०-० असा धुव्वा उडवला.
सुवर्णपदक जिंकल्यानंतर चाहत्यांना अभिवादन करताना सुशील कुमार.