Commonwealth games 2018 These 8 players make India proud
88 वर्षांमध्ये जमलं नाही ते 'या' आठ खेळाडूंनी 'करुन दाखवलं' By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 06:04 PM2018-04-16T18:04:36+5:302018-04-16T18:04:36+5:30Join usJoin usNext भारताची 'आयर्न लेडी' अशी ओळख असणाऱ्या मेरी कोमने राष्ट्रकुल स्पर्धेत पहिलवहिलं पदक जिंकलं. अवघ्या 15 वर्षांच्या अनीश भानवाल याने 25 मीटर रॅपिड फायर प्रकारात सुवर्णपदक पटकावले. मनिका बत्रा हिने टेबल टेनिसमध्ये सांघिक आणि वैयक्तिक प्रकारात चमकदार कामगिरी केली. त्यामुळे भारताला टेबल टेनिसच्या महिला एकेरी आणि सांघिक या दोन्ही प्रकारात सुवर्णपदक जिंकता आले. अवघ्या 16 वर्षांच्या मनू भाकेर हिने 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी करून दाखविली. 23 वर्षांच्या मीराबाई चानू हिने वेटलिफ्टिंगच्या 48 किलो वजनी गटात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. भालाफेकीत सुवर्णपदक जिंकत नीरज चोप्रा याने भारतीयांना सुखद धक्का दिला. सायना आणि पी.व्ही. सिंधू यांच्यामुळे बँडमिंटनचे सुवर्ण आणि रौप्यपदक भारताच्या खात्यात जमा झाले. सायना नेहवाल हिने अंतिम फेरीत भारतच्याच पी.व्ही. सिंधूला नमवत सुवर्णपदकावर नाव कोरले. सुशील कुमारने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.टॅग्स :राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८क्रीडाCommonwealth Games 2018Sports