'Dangal' girl Babita Phogat, kabaddi player Kavita appointed sports dy directors
दंगल गर्ल बबिता फोगाटला लागली 'लॉटरी'; मिळालं महत्त्वाचं पद! By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 05:55 PM2020-08-01T17:55:12+5:302020-08-01T18:02:59+5:30Join usJoin usNext भारताची स्टार कुस्तीपटू बबिता कुमारीनं मागील वर्षात भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला. राजकारणात प्रवेश केल्यानंतर बबिता सोशल मीडियावर अधिक सक्रिय झाली आहे. सोशल मीडियावरून तीन सातत्यानं काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांवर टीका करताना पाहायला मिळते. महाराष्ट्रातील पालघर येथे झालेल्या साधुंच्या हत्येनंतरही बबितानं उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली होती. सोशल मीडियावर बबिता सातत्यानं बबिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कामांची स्तुती करतानाही दिसते. 2018मध्ये बबितानं या पदासाठी अर्ज केला होता. बबिता हरयाणा पोलिसात सब इन्स्पेक्टर होती, परंतु राजकारणात प्रवेश करण्यासाठी तिनं नोकरी सोडली. दंगल गर्ल बबिता आणि कबड्डीपटू कविता देवी यांची हरयाणा सरकारनं क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या उप संचालकपदी नियुक्ती केली आहे. 2009 आणि 2011च्या राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णकमाई करणाऱ्या बबितावर हरयाणा सरकारनं मोठी जबाबदारी टाकली आहे. दंगल गर्ल बबिता आणि कबड्डीपटू कविता देवी यांची हरयाणा सरकारनं क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या उप संचालकपदी नियुक्ती केली आहे. 2018मध्ये बबितानं या पदासाठी अर्ज केला होता. बबिता हरयाणा पोलिसात सब इन्स्पेक्टर होती, परंतु राजकारणात प्रवेश करण्यासाठी तिनं नोकरी सोडली.टॅग्स :बबिता फोगाटकुस्तीहरयाणाBabita Kumari PhogatWrestlingHaryana