Even after becoming a mother, these 'women' players played well
आई झाल्यानंतरही 'या' महिला खेळाडूंनी मैदान गाजवलं By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 08:50 PM2020-02-13T20:50:54+5:302020-02-13T20:55:04+5:30Join usJoin usNext भारताची महान महिला बॉक्सिंगपटू मेरी कोम ३५ वर्षांची आहे. २ वर्षांपूर्वी मेरीने सहावे जागतिक अजिंक्यपद पटकावले होते. मेरी तीन मुलांची आई आहे. भारताची टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झाने काही महिन्यांपूर्वी एका बाळाला जन्म दिला. सानिया जवळपास १५ महिने टेनिसपासून लांब होती. पण त्यानंतर ती मैदानात उतरली आणि तिने होबार्ट टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. भारताची महिला कुस्तीपटू असलेली गुरशरण प्रीत कौरला आपली मुलगी निमरत मुलीसाठी कुस्ती खेळायची आहे. गुरशरण प्रीत कौरला आतापर्यंत दोनवेळा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदके पटकावली आहेत. गुरशरण प्रीत कौर ही पंजाब पोलीस दलात कार्यरत आहे. भारताची महिला क्रिकेटपटू नेहा तंवरनेदेखील आई झाल्यानंतर मैदानात पुनरागमन केले. नेहाचा मुलगा श्लोकचा जन्म सातव्या महिन्यातच झाला होता. त्यानंतर आपण मैदानात पुन्हा येऊ का, हा प्रश्न तिला पडला होता. पण तिने फिटनेसवर जोर दिला आणि तिने येऊन मैदान गाजवल्याचे पाहायला मिळाले. बंगळुरु युनायटेड एफसी संघाची कर्णधार आहे ती अमूल्या वेंकटेश. आई झाल्यानंतर अमूल्याने फुटबॉलमध्ये चांगले नाव कमावले आहे. अमूल्याची मुलगी आता दोन वर्षांची झाली आहे. भारताची रग्बी खेळाडू संगीता बेराने २०१९ साली आशियाई रग्बी महिला चॅम्पियनशिप जिंकली होती. संगीताने २०१५ साली मुलगा रियानला जन्म दिला होता.टॅग्स :सानिया मिर्झाटेनिसबॉक्सिंगकुस्तीSania MirzaTennisboxingWrestling