बाबो! दिग्गज महिला खेळाडूची बाथरूममध्ये प्रसुती, दिला गोंडस बाळाला जन्म!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 17:17 IST2020-06-15T17:12:58+5:302020-06-15T17:17:21+5:30

यूनायटेड फायटिंग चॅम्पियनशीप ( UFC) मधील माजी विजेत्या मिएशा टॅटेनं रविवारी दुसऱ्या बाळाला जन्म दिला. पण, तिची प्रसुती ही घरच्या बाथरूममध्ये झाली.
33 वर्षीय मिएशाच्या पोटात अचानक कळ आली आणि हॉस्पिटलला जाण्याचाही तिला वेळ मिळाला नाही. तिचा पती जॉनी बोयमा याला ही प्रसुती करायला लागली.
मिएशा आणि तिचा पती सिंगापूर येथे आहे. मिएशानं इंस्टाग्रामवरून ही गोष्ट सर्वांना सांगितली.
तिनं लिहिलं की,''डॅक्स्टन विल्डर न्यनेज याचा 14 जूनला सकाळी 8.20 वाजता जन्म झाला. आमच्या कुटुंबात लहान मुलाचे स्वागत... मी चंद्रावर बागडत आहे.''
तिनं पोस्ट केलेल्या फोटोत मिएशा आणि जॉन यांनी बाळाला हातात घेतले आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू दिसत आहेत.
''या जगात येण्याची लहानग्याला एवढी घाई झाली होती की, त्यानं बाथरूममध्येच जन्म घेण्याचा निर्णय घेतला,'' असेही तिनं लिहिले.
4 जून 2018मध्ये मिएशाला कन्यारत्न प्राप्ती झाली होती. मिएशाच्या मोठ्या मुलीचं नाव अमैना नेव्हॅह न्युनेज असे आहे.
शनिवारीच तिनं 40 आठवड्यांची प्रेग्नंट असल्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.