HISTORIC Supercars driver Renee Gracie quit racing to become porn star
धक्कादायक; Racing Carमध्ये इतिहास घडवणारी महिला रेसर बनली 'Porn Star', अन्... By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 01:24 PM2020-06-08T13:24:33+5:302020-06-08T13:29:03+5:30Join usJoin usNext पुरुषांची मक्तेदारी असलेल्या सुपर कार रेसिंगमध्ये रेनी ग्रेसीनं ऐतिहासिक पाऊल ठेवले होते. पुरुषांची ही मक्तेदारी रेनी मोडून काढेल असा विश्वास सर्वांना वाटला होता. ऑस्ट्रेलियाच्या सुपर कार रेसिंगमध्ये ट्रॅकवर उतरलेली ती पहिली महिला रेसर होती आणि तिला पाहून अनेक महिला या क्षेत्राचा गांभीर्यानं विचार करू लागले होते. 2013 आणि 2014मध्ये तिनं Porsche Carrera Cup Australia Championship स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत सहभागी होणारी ती पहिली महिला रेसर ठरली होती. अल्पावधीतच तिनं सर्वांचे लक्ष वेधले. पण, सात वर्षांच्या रेसिंग करिअरनंतर अचानक तिनं पॉर्न स्टार बनण्याचा निर्णय घेतला. कार रेसिंग करणं आता पॅशन राहिलं नाही, असं ती म्हणाली. 25 वर्षीय रेनीच्या निर्णयानं अनेकांना धक्का बसला असेल, परंतु तिला याची पर्वा नाही. या निर्णयानं आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाल्याचे तिनं सांगितलं. डेली डेलेग्राफशी बोलताना तिनं सांगितलं की,''या निर्णयानं माझी व कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. मी स्वप्नातही एवढा पैसा पाहिला नव्हता आणि आता माझ्यासाठी ते महत्त्वाचे आहे.'' ''लोकं मला काय बोलतात, त्याची मला पर्वा नाही. मी चांगली रक्कम कमावत आहे आणि माझ्या निर्णयावर मी ठाम आहे,''असं तिनं सांगितले. कार रेसिंग करून पुरेसा पैसा मिळत नव्हता.. तिला तिच्या कार विकाव्या लागल्या. त्यामुळे तिनं हा टोकाचा निर्णय घेतला. सुरुवातीला न्यूड फोटो अपलोड करून ती आठवड्याला लाखभर रुपये कमवत होती, त्यानंतर तिनं सेक्स व्हिडीओ अपलोड करण्यास सुरुवात केली. तिच्या कुटुंबीयांनीही या निर्णयाला पाठींबा दिला आहे. आता ती आठवड्याला 13,43,017 इतके कमावते.Read in Englishटॅग्स :आॅस्ट्रेलियाAustralia