India rejects this beautiful boxer of Kosovo, know the reason
कोसोवोच्या या सुंदर बॉक्सरला भारताने नाकारला व्हिसा, जाणून घ्या कारण By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 07:05 PM2018-11-17T19:05:27+5:302018-11-17T19:21:29+5:30Join usJoin usNext भारतात जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा सुरू आहे, परंतु कोसोवोच्या खेळाडूला सहभाग न दिल्याने ही स्पर्धा चर्चेत आली आहे. कोसोवोच्या खेळाडूंना व्हीसा न देण्याच्या भारत सरकारच्या निर्णयावर आशियाई ऑलिम्पिक समितीने क्रीडा मंत्री आणि भारतीय ऑलिम्पिक समितीला पत्र पाठवले आहे. दिल्लीत सुरू असलेल्या या स्पर्धेत कोसोवोची एकमात्र खेळाडू डोनजेटा साडिकुने सहभाग घेणार होती. तिच्यासोबत दोन प्रशिक्षक येणार होता. या तिघांनाही व्हिसा नाकारण्यात आला. आशियाई ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष शेख अहमद अल फहज अल सबाह यांनी भारत सरकारच्या या निर्णयावर नाराजी प्रकट केली. भविष्यात भारताला आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद देताना विचार केला जाईल, असा इशारा दिला आहे. 2008 मध्ये कोसोवो सर्बियापासून वेगळा झाला होता आणि त्यांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली. 2014 मध्ये आशियाई समितीने त्यांना सदस्यत्व दिले. मात्र, अजुनही बरेच देश त्यांना मान्यता देत नाही आणि त्यामुळेच त्यांना व्हिसा नाकारण्यात आला आहे. कोसोवोच्या चमूकडे अल्बेनियाचा पासपोर्ट आहे, परंतु त्यांना मान्यता मिळालेली नाही. टॅग्स :बॉक्सिंगboxing