'द क्वीन'! मैदान गाजवणारी ॲथलीट 'हरमिलन', आत्महत्येचा विचार पण आता सुपरहॉट 'मॉडेल' By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 05:03 PM 2024-09-19T17:03:11+5:30 2024-09-19T17:13:56+5:30
आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन पदके जिंकणारी हरमिलन आत्महत्येचा विचार करत होती. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय खेळाडूंना अपेक्षित असे यश मिळवता आले नाही. मागील ऑलिम्पिकच्या तुलनेत भारताला एक पदक कमी मिळाले.
भारतीय शिलेदारांनी एकूण सहा पदकांची कमाई केली. पण, या ऑलिम्पिकमध्ये भारतीय स्प्रिंटर हरमिलन बैन्सला सहभागी होता आले नाही.
आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन पदके जिंकणारी हरमिलन आत्महत्येचा विचार करत होती. याचा खुलासा तिनेच केला असून, कठीण काळाबद्दल भाष्य केले आहे.
आता त्या कठीण टप्प्यातून बाहेर पडल्यानंतर २६ वर्षीय खेळाडू मॉडेलिंगसारखे इतर करिअर पर्याय शोधत आहे. गेल्या वर्षी चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हरमिलनने ८०० मीटर आणि १५०० मीटरमध्ये दोन पदके जिंकली होती.
पण, दुखापतीमुळे हरमिलनला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता आले नाही. तिने सांगितले की, मला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भाग घ्यायचा होता. मी त्यासाठी सर्व प्रयत्न केले होते.
सततच्या दुखापतीमुळे माझ्या खेळीवर परिणाम झाला. ऑलिम्पिक २०२४ मध्ये खेळू न शकल्याने खूप तणावात गेले. मला काहीच समजत नव्हते. अनेकदा आत्महत्या करावी असा विचार मनात येत असे. त्यामुळे खेळातून पूर्णपणे बाहेर पडावे असे वाटत होते, असे ती सांगते.
खरे तर हरमिलनला क्वीन नावानेही ओळखले जाते. तिच्या सोशल मीडिया हँडलवर द क्वीन असा उल्लेख आहे. आपली ॲथलेटिक्स कारकीर्द अनिश्चित असल्याचे तिने कबूल केले. तिच्यावर शस्त्रक्रिया होऊ शकते आणि लवकरच निर्णय घेतला जाईल.