indian sports couple
खेळाच्या मैदानावर जमली आयुष्याची जोडी By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 10:49 AM2018-09-27T10:49:45+5:302018-09-27T10:54:51+5:30Join usJoin usNext भारताची फुलराणी सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पी. कश्यप लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. येत्या 16 डिसेंबरला सायना आणि कश्यप लग्न करणार असून जवळच्या 100 लोकांना या खास विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच लग्नानंतर पाच दिवसांनी म्हणजेच 21 डिसेंबरला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. पण, क्रीडा क्षेत्रातील हे पहिलेच जोडपे नाही. कुस्तीपटू विनेश फोगाटनेही आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजयानंतर सहकारी कुस्तीपटू सोमवीर राठीशी लग्न करणार असल्याची घोषणा केली होती. जकार्ताहून मायदेशात परतलेल्या विनेशने विमानतळावरच सोमवीरसह साखरपुडा केला होता. भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने 12 एप्रिल 2010 मध्ये पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकसी विवाह केला. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकने 2 एप्रिल 2017 मध्ये कुस्तीपटू सत्यवर्थ कादीयनशी विवाह केला. सत्यवर्थने 2014च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक आणि स्क्वॉशपटू दिपिका पल्लिकल यांनी आपले नाते कधीच जगजाहीर केले नाही. त्यांनी 18 ऑगस्ट 2017 मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही पद्धतीत विवाह केला. स्टार कुस्तीपटू गिता फोगाटने दिल्लीच्या कुस्तीपटू पवन कुमार याच्याशी 20 नोव्हेंबर 2016 मध्ये विवाह केला. तिच्या लग्नाला बॉलिवूड स्टार अमिर खान, ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार, साक्षी मलिक आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. क्रिकेटपटू इशांत शर्मा आणि बास्केटबॉलपटू प्रतिमा सिंह यांचा विवाह 10 डिसेंबर 2016 मध्ये झाला. बास्केटबॉल लीगमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून गेलेल्या इशांतची भेट तेव्हाच प्रतिमाशी झाली होती. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती हीना सिधू आणि रोनक पंडित हे दाम्पत्य नेमबाज क्षेत्रात चांगलेच प्रसिद्ध आहे. माजी नेमबाज रोनक हा हीनाचा प्रशिक्षक आहे. भारतीय बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक पुल्लेला गोपिचंद यांनी बॅडमिंटनपटू पी.व्ही.व्ही. लक्षी यांच्याशी विवाह केला. क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नी याने क्रीडा पत्रकार मयांती लँगर हिच्याशी विवाह केला. टॅग्स :सायना नेहवालदिनेश कार्तिकसानिया मिर्झासाक्षी महाराजSaina NehwalDinesh KarthikSania MirzaSakshi Maharaj