वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पिअनशिपमध्ये भारतीय महिला बॉक्सर्सचा बोलबाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 16:47 IST2017-11-27T16:40:41+5:302017-11-27T16:47:29+5:30

भारतीय महिला बॉक्सर्सनी वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पिअनशिपमध्ये शेवटच्या दिवशी पाच सुवर्णपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली.

भारताकडून नितू (48 किलो), ज्योती गुलिया (51 किलो), साक्षी चौधरी (54 किलो), अंकुशिता बोरो (64 किलो) आणि शशी चोप्रा (57 किलो) यांनी सुवर्णपदक जिंकलं.

नितूने अंतिम सामन्यात कझाकिस्तानच्या झाजिराला 5-0 ने हरवत सुवर्णपदक आपल्या नावे केलं.

ज्योतीने रशियाच्या एकातेरिना मोलचानोवाचा 5-0 ने पराभव करत दुसरं सुवर्णपदक आपल्या नावे केलं.

अंकुशिताने अंतिम सामन्यात रशियाच्या एकातेरिना डेनिकचा 4-1 ने पराभव केला. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बॉक्सर म्हणून तिची निवड करण्यात आली.