India's Six Beautiful Sportswoman
भारताच्या सहा ब्युटीफूल स्पोर्ट्सवुमन By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 01:04 PM2018-09-04T13:04:18+5:302018-09-04T13:06:50+5:30Join usJoin usNext जलतरणपटू शिखा टंडनच्या नावावर 146 राष्ट्रीय आणि 36 आंतरराष्ट्रीय पदकं जमा आहेत. बंगळूरुच्या या खेळाडूने 13व्या वर्षी आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच 2004च्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिने 50 व 100 मीटर फ्रीस्टाईल गटात सहभाग घेतला होता. ऑलिम्पिक स्पर्धेत दोन विविध प्रकारात पात्र ठरलेली ती पहिलीच भारतीय खेळाडू होती. सानिया मिर्झा... आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये मानाने घेतले जाणारे नाव. सहा ग्रँडस्लॅम जेतेपद तिच्या नावावर आहेत. त्याशिवाय आशियाई, राष्ट्रकुल आणि अॅफ्रो-एशिया स्पर्धेत तिने 14 पदके जिंकली आहेत आणि त्यात सहा सुवर्णपदकांचा समावेश आहे. भारताची स्क्वॉश क्वीन अशी दीपिका पल्लीकलची ओळख आहे. आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील प्रत्येकी तीन पदके तिच्या नावावर आहेत. उत्तर प्रदेशच्या आकांक्षा सिंग या बास्केटबॉलपटूने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला अनेक विजय मिळवून दिले आहेत. सतत वादात अडकलेली ज्वाला गट्टा ही भारताची सर्वात यशस्वी दुहेरीतील बॅडमिंटनपटू आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिच्या नावावर पदके आहेत. बास्केटबॉल खेळाडू प्राची तेहलानच्या खेळाप्रमाणे सौंदर्याचीही अधिक चर्चा रंगते. तिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने 2011च्या दक्षिण आशिया समुद्रचौपाटी स्पर्धेत प्रथमच पदक जिंकण्याचा पराक्रम केला.टॅग्स :सानिया मिर्झाSania Mirza