Medal of Divya Deshmukh of Nagpur won the World Cadet Chess Championship under 12 years
नागपूरच्या दिव्या देशमुखने 12 वर्षांखालील वर्ल्ड कॅडेट बुद्धीबळ स्पर्धेत जिंकलं सुवर्ण पदक By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2017 06:16 PM2017-09-02T18:16:21+5:302017-09-02T18:20:32+5:30Join usJoin usNext दिव्या देशमुख या नागपूरच्या 11 वर्षांच्या मुलीने ब्राझिलमध्ये झालेल्या 12 वर्षांखालील वर्ल्ड कॅडेट बुद्धीबळ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून इतिहास रचला. 2014 मध्ये दिव्याने 10 वर्षांखालील वर्ल्ड युथ चेस चँपियनशिप स्पर्धेत डरबानमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. दिव्या ही स्त्रीरोग तज्ज्ञ असलेल्या जितेंद्र व नम्रता देशमुख या दांपत्याची मुलगी असून चेन्नईतील आर. बी. रमेश यांच्या चेस गुरूकुल अकादमीची विद्यार्थिनी आहे. गेली दोन ते तीन वर्षे दिव्या चेस गुरुकूलमध्ये प्रशिक्षण घेत आहे. दिव्यामध्ये आत्मविश्वास भरलेला असून ती कुठल्याही दडपणाविना बुद्धीबळ खेळते असे मतही रमेश यांनी व्यक्त केले.