मेजर ध्यानचंद यांची हॉकीतील जादू बघून चक्रावला होता हिटलर; स्टेडियम सोडून जाण्याची आली होती वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 11:15 AM2024-08-29T11:15:28+5:302024-08-29T11:37:46+5:30

हॉकीच्या मैदानातील त्यांच्या अशक्यप्राय खेळामुळे त्यांना हॉकीचे जादूगार असंही म्हटलं जाते.

भारतीय हॉकीला जगात एक मानाचे स्थान मिळवून देण्याच काम मेजर ध्यानचंद यांनी करून दाखवलं. मैदानातील त्यांच्या अशक्यप्राय खेळामुळे त्यांना हॉकीचे जादूगार असंही म्हटलं जाते.

मेजर ध्यानचंद यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी प्रयागराज (पूर्वीचे अलाहाबाद) येथे झाला.

मेजर ध्यानचंद यांनी भारतीय हॉकी संघाला तीन वेळा ऑलिम्पिक पदक मिळवून दिले आहे. गोल करण्याची त्यांची कला दुनियेला आश्चर्यचकीत करणारी होती.

वयाच्या १६ व्या वर्षी भारतीय सैन्यात जवान म्हणून भरती झाल्यानंतर त्यांनी हॉकीचा आपला प्रवास सुरु केला होता.

१९३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत मेजर ध्यानचंद यांनी जर्मनीविरुद्ध ८ गोल डागले होते. या सामन्यात भारताने ८-१ अशा मोठ्या फरकाने विजय नोंदवला होता. या पराभवानंतर हिटलरही संतापाने सामना सोडून स़्टेडियम बाहेर गेल्याचा किस्साही इतिहासात वाचायला मिळतो.

१९२८, १९३२ आणि १९३६ या तीन ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले होते. हा हॉकीचा सुवर्ण काळ मानला जातो. हॉकीतील या योगदानामुळे मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस देशात राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. याशिवाय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ही त्यांच्या नावाने दिला जातो. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराऐवजी आता 'मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार' खेळाडूंना सन्मानित करण्यात येते.

१९३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत मेजर ध्यानचंद यांनी जर्मनीविरुद्ध ८ गोल डागले होते. या सामन्यात भारताने ८-१ अशा मोठ्या फरकाने विजय नोंदवला होता. या पराभवानंतर हिटलरही संतापाने सामना सोडून स़्टेडियम बाहेर गेल्याचा किस्साही इतिहासात वाचायला मिळतो.