अफाट सौंदर्याने पाडलं संकटात; पॅराग्वेच्या जलतरणपटूला सुंदर दिसण्यावरुन ऑलिम्पिकमधून पाठवलं घरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 11:53 AM2024-08-07T11:53:36+5:302024-08-07T12:06:31+5:30

सध्या पॅरिस येथे सुरू असलेले पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये दररोज वेगवेगळ्या देशांतील खेळाडूंच्या विविध खेळातील विजयाच्या बातम्या येत असतात. अशातच एका खेळाडूला तिच्या सौंदर्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धेतून बाहेर पडाव लागलं आहे.

नुकतेच पॅराग्वेची जलतरणपटू लुआना अलोन्सो हिला वाईट वृत्तीमुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून मायदेशी पाठवण्यात आले होते. त्यानंतर तिने जलतरण स्पर्धेतून निवृत्ती घेतली आहे.

मात्र आता या सगळ्या प्रकरणात वेगळीच बातमी समोर आली आहे. लुआना अलोन्सोला तिच्या वागण्यावरुन नाहीतर वेगळ्याच कारणासाठी मायदेशी पाठवण्यात आल्याचं समोर आलं आहे.

इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, लुआनाला मायदेशी पाठवण्यात कारण तिचे अफाट सौंदर्य आहे. तिच्या सौंदर्याने तिच्याच संघातील उर्वरित खेळाडूंचे लक्ष विचलित करत असल्याचे कारण देण्यात आलं आहे.

लुआनाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिच्या सौंदर्याने अनेकांची मने जिंकली आहेत. मात्र तिचे सौंदर्य हे पॅरिस ऑलिम्पिक खेळाडू आणि तिच्यासाठी खूप महागात पडली आहे.

पॅराग्वेला परतल्यानंतर लुआना अलोन्सो जलतरणातून निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. केवळ तिच्या सौंदर्याने हे घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

११ ऑगस्ट रोजी होणाऱ्या पॅरिस गेम्सच्या अधिकृत समारोपापर्यंत खेळाडूंना ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये राहण्याची परवानगी दिली जाते. मात्र लुआनाला तिचे निवासस्थान रिकामे करण्यास सांगण्यात आले. त्यामुळे लुआना मायदेशी परतली.

लुआनाच्या राष्ट्रीय संघ व्यवस्थापकाने दावा केला की तिच्या वर्तणुकीमुळे संपूर्ण पॅराग्वे संघावर वाईट प्रभाव पाडत आहे. मात्र स्वत: लुआनाने अद्याप ऑलिम्पिक गाव सोडण्यास सांगितलेल्या मुद्द्यावर भाष्य केलेले नाही.