Paris Olympics 2024 Opening Ceremony : नवरी नाही पॅरिसची नदी 'नटली'! १२८ वर्षात प्रथमच एवढा भव्य सोहळा, PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 02:54 PM2024-07-27T14:54:53+5:302024-07-27T15:04:52+5:30

Paris Olympic 2024 Live Updates In Marathi : पॅरिस ऑलिम्पिकची ओपनिंग सेरेमनी शुक्रवारी रात्री पार पडली.

पॅरिस ऑलिम्पिकची ओपनिंग सेरेमनी मोठ्या धुमधडाक्यात पार पडली. २६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत पॅरिसच्या धरतीवर ऑलिम्पिकची स्पर्धा पार पडेल.

शुक्रवारी झालेल्या ओपनिंग सेरेमनीने अवघ्या जगाचे लक्ष वेधले. भारतीय वेळेनुसार रात्री ११ वाजता या सोहळ्याला सुरुवात झाली.

तीन-चार तास चाललेल्या या सेरेमनीत विविध प्रात्यक्षित दाखवण्यात आली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे ११७ शिलेदार सहभागी झाले आहेत.

पण, ओपनिंग सेरेमनीमध्ये भारतीय खेळाडूंपैकी केवळ ७८ जणांनी सहभाग नोंदवला होता.

ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात सहभागी झालेले भारतीय पुरुष खेळाडू कुर्त्यामध्ये, तर महिला साडीत दिसल्या.

यावेळी पावसाचे आगमन झाले. मात्र, पाऊस असूनही सोहळ्यात उत्साहाचे वातावरण होते.

विशेष बाब म्हणजे ऑलिम्पिकच्या इतिहासातील हा एकमेव उद्घाटन सोहळा होता, जो कोणत्याही मैदानात न होता बाहेर झाला.

हा उद्घाटन सोहळा सीन नदीवर झाला. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो लोक आले होते.

प्रसिद्ध गायिका लेडी गागा आणि एरियाना ग्रांडे यांनीही उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली होती.

लेडी गागाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. भारताच्या तुकडीने ८४ व्या क्रमांकावर सीन नदीत परेड केली.

दिग्गज बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि अचंता शरथ कमल यांनी तिरंगा फडकावला.

पीव्ही सिंधू ऑलिम्पिकमध्ये पदकाची हॅटट्रिक मारणार का हे पाहण्याजोगे असेल.

मागील अर्थात टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण सात पदके जिंकली होती. नीरज चोप्राच्या रूपात भारतात एकमेव सुवर्ण पदक आले.

खरे तर भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये २५ जुलैपासूनच अर्थात उद्घाटन समारंभाच्या एक दिवस आधी आपल्या मोहिमेला सुरुवात केली.