Photo : ना गाजावाजा, ना धुमधडाका! जगात नंबर १ असलेल्या भारतीय खेळाडूनं रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 15:41 IST2022-09-15T15:38:45+5:302022-09-15T15:41:52+5:30

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी थेट इटलीत लग्न केलं. असे अनेक सेलिब्रेटी आहेत की ज्यांच्या लग्नाची जगभरात चर्चा झाली.

जगात नंबर १ असूनही भारताच्या एका खेळाडूने चक्क रजिस्टार ऑफिसमध्ये जाऊन साधेपणानं लग्न केलं...

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय ( HS Prannoy) याने नुकतंच गर्लफ्रेंड श्वेता गोमेज ( Sweta Gomes) हिच्यासोबत रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन लग्न केलं.

BWF वर्ल्ड टुअरच्या क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या प्रणॉयने २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला मिश्र सांघिक गटाचे सुवर्णपदक जिंकून दिले होते.

भारताच्या ऐतिहासिक थॉमस कप स्पर्धेतील गोल्ड मेडलिस्ट संघातही त्याचा मोलाचा वाटा होता.

नवी दिल्लीत जन्मलेल्या ३० वर्षीय प्रणॉय केरळामध्ये राहतो आणि गोपिचंद बॅडमिंटन अकादमीत तो प्रशिक्षण घेतोय.

प्रणॉयने २०१०मध्ये युवा ऑलिम्पिक स्पर्धेत मुलांच्या एकेरीत रौप्यपदक जिंकून सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर २०११मध्ये बहरीन आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही त्याने रौप्यपदक जिंकले होते.

सातत्यपूर्ण कामगिरी करत त्याने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये स्वतःचे नाव लौकिक केले. त्याने २०१४मध्ये इंडोनेशिया मार्स्टर्स, २०१६ मध्ये स्वीस ओपन व २०१७ मध्ये यूएस ओपन स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. २०१४ मद्ये त्याला व्हिएतनाम ओपनमध्ये उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले होते