स्टार खेळाडूनं महिला फॅन्सकडून करून घेतला मसाज; धडा शिकवण्यासाठी गर्भवती पत्नी पोहचली मियामीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 15:50 IST2021-05-19T15:48:30+5:302021-05-19T15:50:45+5:30

स्टार असणेही डोखेदुखी ठरू शकते. सार्वजनिक ठिकाणी फिरताना स्टार्सना अनेक बंधनं पाळावी लागतात. त्यात जर आजुबाजुला फॅन्सचा गोतावळा जमा झाला मग काही खैर नाही. असंच काहीसं दिग्गज बॉक्सर टायसन फ्यूरी ( tyson fury) याच्यासोबत घडलं अनेक त्याची पत्नी भलतीच भडकली.
फ्यूरीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. गर्भवती पत्नीला घरीच ठेऊन फ्यूरी मियामीत सुट्टीवर गेला आणि तेथे तो महिला फॅन्सकडून मसाज करून घेताना दिसला.
सोशल मीडियावर फ्यूरीचे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर गर्भवती पत्नी पेरिस फ्यूरी त्याला धडा शिकवण्यासाठी 4 हजार मैलाचा प्रवास करून मियामीत पोहोचली. आता या दोघांनी मियामितील फोटो पोस्ट केले आहेत.
इंस्टाग्रामवर फ्यूरीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पेरिसनं तिच्या इंस्टा अकाऊंटवर वेडिंग रिंग लपवताचा फोटो पोस्ट केला होता.
टायसन व पेरिस यांना पाच मुलं आहेत आणि ती सहाव्यांदा गर्भवती राहिली आहे.