Pro Kabaddi League 2021-22: कबड्डीच्या मॅटवर महिला फुटबॉलपटूची 'सर्व्हिस'; जाणून घ्या कोण आहे Abeer Arsiwala! By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 04:37 PM 2021-12-21T16:37:44+5:30 2021-12-21T16:46:43+5:30
Pro Kabaddi League 2021-22 Maharashtra Player's: प्रो कबड्डी लीगच्या ( PKL) २०२१-२२ पर्वाला २२ डिसेंबरपासून बंगळुरू येथे सुरूवात होत आहे. पहिल्या चार दिवसांत ‘Triple Headers’ असे सामने होतील, तर शनिवारी ‘Triple Panga’ रंगणार आहे. Pro Kabaddi League 2021-22 Maharashtra Player's: प्रो कबड्डी लीगच्या ( PKL) २०२१-२२ पर्वाला २२ डिसेंबरपासून बंगळुरू येथे सुरूवात होत आहे. पहिल्या चार दिवसांत ‘Triple Headers’ असे सामने होतील, तर शनिवारी ‘Triple Panga’ रंगणार आहे.
यू मुंबा आणि बंगळुरू बुल्स यांच्या लढतीनं प्रो कबड्डीच्या ८व्या पर्वाला सुरुवात होणार. त्यानंतर तेलुगु टायटन्स विरुद्ध तामिळ थलाव्हाज असा दक्षिण डर्बीचा सामना रंगणार आहे. यूपी योद्धा समोर गतविजेत्या बंगाल वॉरियर्स यांचे आव्हान असणार आहे. हा सर्व मसाला स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी चाखता येणार आहे.
पण, या कबड्डीच्या मॅटवर एका महिला फुटबॉलपटूच्या चढाईची चर्चा रंगली आहे. अबीर अर्सिवाला (Abeer Arsiwala ) असं या महिला फुटबॉलपटूचं नाव आहे. पण, प्रो कबड्डी लीगमध्ये ती एका वेगळ्याच भूमिकेत आहे आणि त्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. अबीर ही प्रो कबड्डी लीगमधील एकमेव महिला ट्रेनर आहे आणि ती यू मुंबासोबत काम करते.
२४ वर्षीय अबीर आणि तिचा सहकारी मॅन्यूएल डी'सोजा यांना यू मुंबानं २०१९मध्ये strength and conditioning trainers म्हणून करारबद्ध केलं आहे. मुंबईची मुलगी ही फुटबॉलपटू आहे. दोन मोठ्या भावंडांसह तिनं फुटबॉल खेळण्यास सुरूवात केली. २००९मध्ये तिनं महाराष्ट्राकडून पहिली राष्ट्रीय स्पर्धा खेळली. त्यानंतर भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे AFC U-19 Women’s Championship qualifiers Round 1 and 2 स्पर्धेत प्रतिनिधित्व केले.
२०१६ व २०१७ मध्ये तिची सीनियर नॅशनल कॅम्पसाठी निवड झाली होती, परंतु तिला संघात स्थान पटकावता आले नाही. २०१७मध्ये तिनं DY Patil College मधून हॉटेल मँनेजमेंटची पदवी घेतली. फुटबॉलचा खर्च उचलणे तिला अवघड जात होते आणि त्यामुळे तिनं वेगळ्या करियरची निवड केली. तिनं strength and conditioningचा अभ्यास सुरू केला.
तिनं US-based National Academy of Sports Medicine मधून Performance Enhancement Specialization ऑनलाईन कोर्स केला. त्याच जोरावर तिनं २०१९मध्ये यू मुंबाकडून strength and conditioning ट्रेनरसाठी तिला करारबद्ध करण्यात आले. यू मुंबाचा फुटबॉल क्लबही आहे आणि प्रो व्हॉलीबॉल लीगमध्येही त्यांचा संघ आहे. आता ती यू मुंबाच्या खेळाडूंची ट्रेनर आहे.