आठ फेरे, एका रुपयात लग्न आणि 'बेटी बचाओ'चा संदेश; अशी आहे भारतीय खेळाडूच्या लग्नाची गोष्ट...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 16:43 IST2019-12-02T16:36:56+5:302019-12-02T16:43:24+5:30

लग्न करताना सात फेरे घेतले जातात, पण भारताच्या एका खेळाडूने तर आठ फेरे घेतले.
हे आठ फेरे घेऊन या खेळाडूने एक खास संदेश दिल्याचे पाहायला मिळाले आहे.
आठवा फेरा घेताना ‘बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ’ हा संदेश सप्तपदीनंतर देण्यात आला.
या लग्नाचे आमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही देण्यात आल्याचे समजते.
या लग्नात कोणताही हुंडा वैगेरे देण्यात आला नाही. फक्त एक रुपयामध्ये हे लग्न जुळवण्यात आले.
लग्नाचा खर्च कमी असावा, यासाठी फक्त २१ जणांनाच लग्नाला आमंत्रित करण्यात आले होते.
आता तुम्ही विचार कराल, हे अनोखे लग्न भारताच्या कोणत्या खेळाडूने केले.
'दंगल गर्ल' या नावाने प्रसिद्ध असलेल्या बबिता कुमारी फोगटचे लग्न अशा अनोख्या पद्धतीने करण्यात आले.
बबिताने भारत केसरी केसरी कुस्तीपटू विवेक सुहागबरोबर लग्न केले.