स्क्वॉश क्वीन दीपिका पल्लीकल! By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 04:28 PM 2018-09-02T16:28:59+5:30 2018-09-02T16:33:35+5:30
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला महिला एकेरीत कांस्यपदक जिंकून देणाऱ्या स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकलबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होणे साहजिकच आहे. भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याची पत्नी अशी ओळख तिला आता मिळाली, परंतु भारताची आघाडीची स्क्वॉशपटू म्हणून तिने नाव कमावले आहे. खेळाबरोबरच दीपिकाच्या सौंदर्याचीही फार चर्चा होत आहे.
जागतिक स्क्वॉश क्रमवारीत अव्वल दहा महिला खेळाडूंमध्ये स्थान पटकावणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे.
तिची आई सुसान पल्लिकल या भारतीय महिला क्रिकेट संघाकडून खेळल्या होत्या.
सहाव्या इयत्तेत असताना दीपिकाने पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली होती.
अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणारी ती पहिली स्क्वॉशपटू आहे. 2012 मध्ये तिला हा पुरस्कार देण्यात आला होता, तर 2014 मध्ये तिला पद्म श्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
जानेवारी 2014 मध्ये दीपिकाने चॅम्पियन्स स्क्वॉश स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता आणि अशी कामगिरी करणारीही ती पहिलीच भारतीय खेळाडू होती.