Story of Sheetal Devi : जन्मापासूनच नाही दोन्ही हात, तरी करते अप्रतिम तिरंदाजी; ऐतिहासिक पदक जिंकणाऱ्या काश्मिरी कन्येची कहाणी By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 10:06 PM 2023-07-22T22:06:21+5:30 2023-07-22T22:10:57+5:30
Story of 16 year old Sheetal Devi भारताच्या शीतल देवीने पॅरा आर्चरी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. १६ वर्षीय हितलला दोन्ही हात नाहीत आणि तिने पायांच्या मदतीने तिरंदाजी करून हे यश मिळवले. झेक प्रजासत्ताक येथे सुरू असलेल्या पॅरा तिरंदाची जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत राकेश/सरिता या जोडीने भारताला पहिलेवहिले सुवर्णपदक जिंकून दिले. राकेश/सरिता यांनी १५२-१४६ अशा फरकाने चाराओ/गोगेल या जोडीचा मिश्र सांघिक गटाच्या फायनलमध्ये पराभव केला.
भारताच्या शीतल देवीने पॅरा आर्चरी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. १६ वर्षीय हितलला दोन्ही हात नाहीत आणि तिने पायांच्या मदतीने तिरंदाजी करून हे यश मिळवले. चीनच्या क्युर ओझनूरने १४०-१३८ अशा फरकाने सुवर्णपदक नावावर केले.
किश्तवाड (जम्मू-काश्मीर) जिल्ह्यातील लोई धार या दुर्गम गावातील शीतल देवीला जन्मापासून हात नाही. असे असूनही १६ वर्षीय मुलीने हार मानली नाही. दीड वर्षापूर्वी एका लष्करी अधिकाऱ्याने कटरा येथील माता वैष्णोदेवी श्राइन बोर्ड आर्चरी अकादमीचे प्रशिक्षक कुलदीप वेदवान यांना शीतलबद्दल सांगितले. इथूनच शीतलच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
तिच्यासाठी एक विशेष धनुष्य तयार केले गेले, जे हाताने नाही तर पाय आणि छातीने चालवले जाते. सहा महिन्यांत, शीतलने यात प्रभुत्व मिळवले आणि पिलसेन (चेक प्रजासत्ताक) येथे खेळल्या जाणार्या जागतिक पॅरा तिरंदाजीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती जगातील पहिली हात नसलेली महिला तिरंदाज ठरली. तिने रौप्यपदक जिंकले.
दीड वर्षापूर्वी शीतलने तिरंदाजीला सुरुवात केली तेव्हा ती हात नसलेली जगातील पहिली महिला तिरंदाज ठरली, पण आता संपूर्ण जगात हात नसलेले एकूण सहा तिरंदाज आहेत. शीतलसोबत पिलसेन येथील श्राइन बोर्ड अकादमीच्या प्रशिक्षक अभिलाषा सांगतात की तिला तिरंदाजीमध्ये सुरुवात करणे हे एक आव्हानात्मक काम होते. जेव्हा शीतल इथे आली तेव्हा तिने इतर पॅरा तिरंदाजांना अकादमीत सराव करताना पाहिले, म्हणून तिने हा खेळ घेण्यास होकार दिला.
अकादमीत तिच्यासाठी खास धनुष्यबाण तयार करण्यात आले होते. सहा महिन्यांतच ती निपुण धनुर्धारी बनली. पॅरा सोडून इतर सामान्य धनुर्धारी खेळाडूंसोबतही ती खेळू लागली. पण आता संपूर्ण जगात एकूण सहा हात नसलेले धनुर्धारी आहेत. तिने पहिल्या आंतरराष्ट्रीय पॅरा टूर्नामेंटमध्ये दोन रौप्य आणि कांस्यपदक जिंकले.
बाण कसे सोडायचे हे त्यांना सांगणे कठीण होते. यासाठी कुलदीप आणि त्याने शीतलला जगातील पहिला हात नसलेला तिरंदाज अमेरिकेच्या मॅट स्टुटझमनचा व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली. यामुळे खूप मदत झाली.
जागतिक स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करून तिने पॅरिस पॅरालिम्पिकची तिकिटेही मिळवली आहेत. शीतल ही अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. त्याचे वडील शेतकरी असून आई शेळ्या पाळते.