'सानिया' सध्या काय करते? लेकासोबत मस्ती अन् बरंच काही; फोटो शेअर दाखवली झलक By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 04:51 PM 2024-08-18T16:51:17+5:30 2024-08-18T17:02:38+5:30
सानिया मिर्झा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. भारताची स्टार टेनिस स्टार सानिया मिर्झा फावल्या वेळात आपल्या मुलासोबत वेळ घालवते. ती सातत्याने सोशल मीडियावर याची झलक पोस्ट करत असते.
कधी दुबई तर कधी जगातील इतर नामांकित शहरांना ती भेट देत असते. आता तिने काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये सानियाची भटकंती, मुलगा इझहान आणि इतर बऱ्याच बाबींचा उल्लेख आहे.
तिने कॅप्शनच्या माध्यमातून म्हटले की, फ्लाइट्स, लॉलीपॉप, शूट, कार्यक्रम, पाणी पुरी, लुडो, कुटुंब, मित्र आणि बरेच काही.
सानिया आणि शोएब मलिक हे वेगळे झाले आहेत. शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले. त्याचे हे तिसरे लग्न आहे.
२०१० मध्ये सानिया आणि शोएबचे लग्न झाले होते. या दोघांचे नाते सुमारे १४ वर्ष टिकले. शोएब आणि सानिया यांच्या नात्यात दोन वर्षांपासून हळूहळू दुरावा येण्यास सुरूवात झाल्याच्या चर्चा होत्या.
एका मॉडेलसोबतचे स्विमिंग पूल मधील इंटिमेट फोटोशूट याला कारणीभूत ठरले होते. त्यानंतर सानिया-शोएब वेगळे होणार अशी सातत्याने चर्चा होती. त्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला.
दरम्यान, पाच महिने डेट केल्यानंतर शोएब आणि सानिया यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नबंधनात अडकण्यापूर्वी दोघांनी त्यांच्या आधीच्या पार्टनरशी संबंध तोडले होते.
शोएब त्याची पूर्वीश्रमीची पत्नी आयेशा सिद्दीकीपासून विभक्त झाला होता. तर, सानियाने सोहराब मिर्झासोबत साखरपुडा केल्यानंतर लग्न मोडले होते.
१२ एप्रिल २०१० रोजी हैदराबादमध्ये ग्रँड पद्धतीने त्यांचे लग्न पार पडले होते. लग्नानंतर त्यांचे रिसेप्शन सियालकोटमध्ये झाले होते.
लग्नाच्या ८ वर्षानंतर म्हणजेच २०१८ मध्ये या जोडप्याला एक मुलगा झाला ज्याचे नाव त्यांनी इझहान मिर्झा मलिक असे आहे.