Tokyo Olympic : परी म्हणू की सुंदरा!; सोशल मीडियावर व्हायरल झालेली 'ती' मुलगी कोण?, पाहा Photo

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 16:20 IST2021-08-03T16:13:42+5:302021-08-03T16:20:10+5:30

टोकियोत सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सध्या एक नाव जास्तच चर्चेत आहे. हे नाव मैदानावरील कामगिरीसोबत तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आले आहे.

टीझूयू ( Tzuyu) असे या तरुणीचे नाव असून सध्या सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा सुरु आहे. या तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून ती चीन, तैवान आणि कोरियाची तिरंदाज असल्याची चर्चा आहे.

व्हायरल होत असलेल्या फोटोत Tzuyu तिरंदाजी करताना दिसते. मात्र वास्तविक ती सध्या सुरु असलेल्या ऑलिम्पिकमध्ये सहभागीच नाही.

ब्राझीलच्या एका पत्रकाराने ट्विट करून माहिती दिली की Tzuyu ने आईडल स्टार ऍथलेटिक्समध्ये सहभाग घेतला होता.

Tzuyu चा सध्या व्हायरल होत असलेले व्हिडिओ व फोटो ISAC स्पर्धेतील आहेत. ती तैवानची नागरिक असून ती एक गायिका आहे.