Top athletes that travel in style in their own fancy private jets
Wow! जगातील अव्वल खेळाडूंची हाय'फ्लाय' By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 03:02 PM2019-03-14T15:02:34+5:302019-03-14T15:05:56+5:30Join usJoin usNext फुटबॉलपटूंना बक्कळ मानधन दिले जाते, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या मागे स्पॉन्सर्सची रिघ लागलेली असते त्यामुळे क्रीडा क्षेत्रात सर्वात ऐश आरामाचे आयुष्य कोण जगत असतील तर ते फुटबॉलपटू... असा विचार येणं साहजिकच आहे. हे भारतीय फुटबॉलपटूंच्या बाबतित नाही बोलता येणार. पण, जगभरातील दिग्गज फुटबॉलपटूंचे राहणीमान कुणालाही हेवा वाटावेसे आहे. या फुटबॉलपटूंच्या तोडीस तोड आलिशान आयुष्य जगणारेही काही खेळाडू आहेत. त्यांच्या भवतीही चाहत्यांचा, स्पॉन्सर्सचा गोतावळा सतत असतो. काहींकडे तर दूर देशात प्रवेश करण्यासाठी स्वतःचे जेट्स आहेत. अशाच जगातील अव्वल खेळाडूंच्या हाय'फ्लाय'वर आपण आज नजर टाकणार आहोत. जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू असलेल्या बॉक्सर फ्लॉयड मेव्हेदरकडे स्वतःच कार कलेक्शन आहे. पण, येथेच त्याच्या श्रीमंतीचा थाट थांबत नाही. मेव्हेदरकडे स्वतःच्या मालकिचे एक नव्हे तर दोन जेट्स आहेत. त्याने आपल्या ताफ्यात आणखी एक 12 सीटर जेट समाविष्ट केला आहे. WWEमधील गाजलेलं नाद ट्रिपल एच... WWE मध्ये ट्रिपल एचनं सर्व काही साध्य केलं. पत्नी स्टेफनी आणि त्याची भेट WWE मध्येच झाली. WWEच्या निमित्तानं त्याला बरीच भ्रमंती करावी लागते. त्यामुळेच त्यांन खाजगी जेट खरेदी केलं आहे. NBA सुपरस्टार मिचेल जॉर्डन याच्याकडे स्वतःचं जेट आहे, परंतु त्यानं ते त्याला हव्या असलेल्या डिझाईननुसार बनवून घेतले आहे. त्याच्या या जेटची क्रीडाक्षेत्रातही चांगली चर्चा रंगली आहे. अॅलेक्स रॉड्रीगेज या बेसबॉल स्टार खेळाडूच्या ताफ्यात नुकताच जेट 60 दाखल झाला आहे. अत्याधुनीक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या जेटची हवा सर्वत्र आहे. या पंक्तीत दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याचे नाव नसेल तर नवल. त्याच्याकडेही स्वतःचे जेट आहे. टॅग्स :रॉजर फेडररविमानRoger fedrerairplane