जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये रॉजर फेडरर अव्वल; टॉप 100 मध्ये एकच भारतीय! By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 11:19 AM 2020-05-30T11:19:05+5:30 2020-05-30T11:23:17+5:30
फोर्ब्स मॅगझीननं शुक्रवारी 2020मधील जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली. आश्चर्याची बाब म्हणजे इतिहासात प्रथमच टेनिसपटूनं या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडररनं या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. फेडररने 2020मध्ये 106.3 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 802 कोटींची कमाई केली आहे.
दुसऱ्या क्रमांकावर पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याचा क्रमांक येतो. त्याचे वर्षाचे उप्तन्न 792 (105 मिलियन डॉलर) कोटी इतकी आहे.
बार्सिलोना आणि अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी 785 कोटींसह (104 मिलियन डॉलर) तिसऱ्या स्थानावर आहे.
ब्राझिलचा फुटबॉलपटू नेयमार 721 कोटींसह चौथ्या स्थानावर आहे.
अमेरिकेचा बास्केटबॉलपटू लेब्रोन जेम्स 666 कोटी
अमेरिकेचा बास्केटबॉलपटू केव्हीन डुरांट 482 कोटी
अमेरिकेचा बास्केटबॉलपटू स्टीफन करी 561 कोटी
अमेरिकेचा गोल्फपटू टायगर वूड्स 470 कोटी
अमेरिकेचा फुटबॉलपटू किर्क कौसिन्स 456 कोटी
अमेरिकेचा फुटबॉलपटू कार्सन वेंट्स 446 कोटी
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा अव्वल 100 मध्ये असलेला एकमेव भारतीय खेळाडू आहे. 196 कोटींसह तो या क्रमवारीत 66 व्या स्थानावर आहे.