कोण आहे सोफिया सीव्हिंग, जिने पहिलीवहिली पिकलबॉल स्पर्धा जिंकून रचला इतिहास (Photos) By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 03:05 PM 2024-10-28T15:05:08+5:30 2024-10-28T15:34:29+5:30
Sofia Sewing, Pickleball Winner: तृतीय मानांकित सीव्हिंगने अव्वल मानांकित काओ पै चुआन हिचा ११-३, ११-२ अशा सरळ गेममध्ये केला पराभव Who is Sofia Sewing Pickleball Player Photos: अमेरिकेची खेळाडू सोफिया सीव्हिंग हिने नुकत्याच झालेल्या PWR DUPR India Masters Pickleball Championship स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावून इतिहास रचला.
तृतीय मानांकित खेळाडू असूनही सीव्हिंगने अंतिम फेरीत अव्वल मानांकित काओ पै चुआन हिचा ११-३, ११-२ अशा सरळ गेममध्ये पराभव केला.
सोफिया सीव्हिंगचा जन्म २२ जुलै १९९९ रोजी मियामीमध्ये झाला. ती आधी एक व्यावसायिक टेनिस खेळाडू होती. तिने आतापर्यंत सुमारे $ ७६,००० पेक्षा जास्त बक्षीस रक्कम जिंकली आहे.
सोफियाने टेनिस खेळताना ITF ज्युनियर रँकिंगमध्ये टॉप10 मध्ये प्रवेश केला होता. तिने महिला एकेरी प्रकारात WTA क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम ४५५वे स्थान गाठले होते.
सोफिया २०२२ मध्ये WTA चॅलेंज टूरच्या अंतिम फेरीत पोहोचली. तिने टेनिस खेळताना महिला एकेरीची ४ आणि दुहेरीची १४ विजेतेपदे जिंकली आहेत.
सध्या ती पिकलबॉलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. PWR DUPR India Masters Pickleball हे तिचे पहिले विजेतेपद जिंकले.
सर्व फोटो सौजन्य- सोफिया सीव्हिंग इन्स्टाग्राम