नामदेव कुंभार/ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 24 - आयसीसीकडून आयोजित करण्यात येणारी चॅम्पियन करंडक स्पर्धा ही विश्वचषकानंतरची सर्वात मोठी स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेला मिनी विश्वचषक म्हणून ही ओळखले जाते. 1998 मध्ये या स्पर्धेला सुरुवात झाली होती. सुरुवतीला या ट्रॉफीचे नाव नॉक आउट टूर्नामेंट होते. मात्र त्यात बदल करून आयसीसी चॅमिप्यन्स ट्रॉंफी ठेवण्यात आले. नॉक आउट टूर्नामेंटमध्ये एकदा पराभूत झालेल्या संघाला चषकाबाहेर जावे लागत होते. मात्र त्यानंतर चषकाच्या स्वरूपात बदल करून चषकाची रचना गटनिहाय करण्यात आली. अर्थात प्रत्येक गटातील संघातील संघ कमीत कमी एकदा तरी लढत देऊ शकेल. तसेच गुणाच्या आधारावर संघाचे चषकातील भवितव्य अवलंबून असते.यावर्षी आयसीच्या आठव्यांदा रंगणाऱ्या स्पर्धेत क्रमवारीत अव्वल आठ संघ सहभागी झाले आहेत. या आठ संघाचे दोन गटात वर्गीकरण करण्यात आले आहे. 1 जून पासून सुरु होणाऱ्या स्पर्धेसाठी गतविजेता भारतीय संघ ब गटात खेळताना दिसणार असून या गटात त्यांना पाकिस्तान, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका या संघाचे आव्हान असेल. तर अ गटात इंग्लड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि न्यूझीलंड या संघांचा समावेश आहे. सात वेळा झालेल्या या स्पर्धेत द. आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि भारताने प्रत्येती एक वेळा ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. पावसामुळे भारत आणि श्रीलंकेला एकदा सामाईक विजेता घोषित केले होतं. तर ऑस्ट्रेलियाने दोन वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. आजपर्यंत कशी झाली ही स्पर्धा. कोण आहेत विजेते आणि उपविजेते जाणून घेऊयात.2013 (विजेता संघ - भारत, कर्णधार - एम.एस. धोनी) -यजमान इंग्लंडवर 5 धावांनी मात करत भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरल होतं. या स्पर्धेत भारतीय टीम अपराजित राहिली. आक्रमक फलंदाजी, भेदक गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर भारताच्या युवा खेळाडूंनी इंग्लडंचा पराभव केला होता. पावसामुळे अंतिम सामना 20 षटकाचा खेळवला गेला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताना शिखर धवन, रविंद्र जडेजा आणि विराट कोहलीच्या फलंदाजीच्या बळावर सात बाद 129 धावा केल्या होत्या. 130 धावांचा पाठलाग करताना यजमान इंग्लडला 20 षटकात 8 वाद 124 धावापर्यंत मजल मारता आली. भारताच्या भेदक गोलंदाजी समोर इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली.2009 (विजेता संघ - ऑस्ट्रेलिया )दक्षिण आफ्रिकेत 22 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर, दरम्यान वाँडरर्स मैदान आणि सेंच्युरीयन पार्क येथे खेळण्यात आली होती. मुळ कार्यक्रमानुसार ही स्पर्धा 12 ते 28 सप्टेंबर दरम्यान पाकिस्तानात होणार होती. श्रीलंका संघावर पाकिस्तानात झालेल्या हल्ल्यानंतर अनेक संघानी सहभागी होण्यास दर्शवलेल्या असमर्थते मुळे आयसीसी ने ही स्पर्धा द. आफ्रिकेत आयोजित केली होती. या स्पर्धेत अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात झाला होता. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा सहा विकेटने पराभव केला होता.2006 (विजेता संघ - ऑस्ट्रेलिया )आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची ही पाचवी आवृत्ती होती. भारतात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने जेतेपद पटकावले होते. वेस्ट इंडीज संघाने ऑस्ट्रेलियाला गट फेरीत हरवले परंतू अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजला अवघ्या 138 धावांवर सर्वबाद करून ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून विजय मिळवला. वेस्ट इंडीजा सलामीवीर क्रिस गेलला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. एकतर्फी झालेल्या सामन्यात शेन वॅटसनच्या अष्टपैलू खेळीमुळे त्याला सामनाविराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. या सामन्यात फलंदाजी करताना वॅटसनने 57 धावा केल्या होत्या आणि गोलंदाजी करताना 3 बळी घेतले होते. या स्पर्धेमध्ये, स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात कमी 10 पैकी 5 सांघिक धावसंख्या नोंदवल्या गेल्या. एकदिवसीय क्रमवारीतील पहिल्या 8 स्थानांवरील संघांचा समावेश असलेल्या सामन्यांत 80 (वेस्ट इंडीज, श्रीलंकेविरूद्ध) आणि 89 (पाकिस्तान, दक्षिण आफ्रिकेविरूद्ध) ह्या सर्वात निचांकी धावांची नोंद झाली.2004 (विजेता संघ - वेस्टइंडीज)इंग्लडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर वेस्ट इंडिजे नाव कोरले. यजमान इंग्लडचा वेस्ट इंडिजने पराभव करत पहिल्यांदाज मिनी विश्वचषक पटकावला. रोमांचक झालेल्या आंतिम सामन्यात इंग्लडचा दोन विकेटने पराभव झाला होता.2002 (विजेता संघ - भारत, श्रीलंका)2002 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे श्रीलंकेत आयोजन करण्यात आले होते. "राऊंड रॉबिन" फॉर्मेटच्या आधारे खेळण्यात आलेल्या चषकात भारतीय संघ पुन्हा फायनलमध्ये पोहचला आणि विजयीही ठरला होता. मात्र पावसाअभावी सामना तब्बल एक दिवस उशीरा वाट पाहिल्यानंतर ही अंतिम सामना पूर्ण न खेळला गेल्याने भारताच्या विजयात श्रीलंकेने वाटा पाडला होता.अंतिम सामन्यात पाऊस येण्यापूर्वी भारताची गोलंदाजी सुरु असताना गांगुलीला शिवीगाळ झाली होती. श्रीलंकेचा डावखुरा फलंदाज रसेल अर्नाल्ड धाव घेण्याच्या निमित्ताने पिच उकरण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी टीमचा यष्टीरक्षक राहुल द्रविडने अर्नाल्डलाची ही हरकत पाहून त्याला असे न करण्यास सांगितले. त्याने याची माहिती कर्णधार गांगुलीलादेखील दिली. गांगुलीने लगेच रिऍक्ट होत अर्नाल्डला असे करण्यास मनाई केली. गांगुलीने अर्नाल्डला विकेटवरून न धावण्यास समजावून सांगितले. यावर भडकलेल्या अर्नाल्डने गांगुलीला शिवी देण्यास सुरूवात केली. दोन्ही खेळाडूंना रोखण्यास पंच डेव्हिड शेपर्ड यांना मध्यस्थी करावी लागली.2000 (विजेता संघ - न्यूझीलंड)पूर्ण मालिकेत शानदार कामगिरी करून भारतीय संघ फायनलमध्ये पोहचला होता, मात्र तेथे भारतीय संघाच्या पदरात निराशाच पडली होती. न्यूझीलंडने भारताचा चार विकेटने पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले होते.1998 (विजेता संघ - द. अफ्रीका )बांगलादेशात 1998 मध्ये पहिली "नॉक आउट टूर्नामेंट" आयोजित करण्यात आली होती. सुरुवतीला या ट्रॉफीचे नाव नॉक आउट टूर्नामेंट होते. मात्र त्यात बदल करून आयसीसी चॅमिप्यन्स ट्रॉंफी ठेवण्यात आले. या स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यात द. आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा चार विकेटने पराभव केला होता.