World champion runner Nicholas die in road accident
विश्वविजेत्या निकोलस बेटचा दूर्दैवी अंत By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 01:47 PM2018-08-08T13:47:28+5:302018-08-08T13:59:05+5:30Join usJoin usNext तीन वर्षांपूर्वी विश्व अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेत 400 मीटर अडथळ्याच्या शर्यतीत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणा-या निकोलस बेटचा रस्ता अपघातात दूर्दैवी अंत झाला. केनियाच्या या 28 वर्षीय धावपटूच्या गाडीला पश्चिम केनियातील नँडी कौंटी येथे भीषण अपघात झाला. काँटीनेंटल अजिंक्यपद स्पर्धेच्या बरोबर एक दिवसापूर्वी बेटला आपले प्राण गमवावे लागले. 2018 मध्ये मृत्युमुखी पडलेले काही दिग्गज खेळाडू.. 14 वर्ष लिव्हरपूल फुटबॉल क्लबचे गोलरक्षक राहिलेल्या टॉमी लॉरेन्स यांना 'दी फ्लाईंग पिग' असे टोपणनावाने ओळखले जायचे. 9 जानेवारी 2018 मध्ये त्यांचे निधन झाले. इंग्लंडचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू सायरील रेगीस यांचे 59 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी वेस्ट ब्रॉमविच अॅल्बियन आणि कोव्हंट्री सिटी या क्लबचे प्रतिनिधित्वही केले आहे. 14 जानेवारीला त्यांचा मृत्यु झाला. इटलीचा प्रमुख खेळाडू डेव्हीड अॅस्टोरी याला वयाच्या 31व्या वर्षी मृत्यूने कवटाळले. 4 मार्चला या फुटबॉलपटूचे निधन झाले. 18व्या वाढदिवशीच ग्रेट ब्रिटनच्या स्नोव्हबोर्डर एली सॉटरने आत्महत्या केली. 25 जुलैला तिने फ्रान्समध्ये राहत्या घरी आत्महत्या केली. 2010 च्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेती व्हिबेके स्कॉफ्टेरूडलला जेट स्की करताना अपघातात मृत्यु झाला. निकोलस बेटने 2015च्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते, केनियासाठी अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू होता. टॅग्स :क्रीडाSports