आता सोडा नोकरीचं टेन्शन, या फिल्डमध्येही आहे कमाईची मोठी संधी! By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 12:45 PM 2018-09-27T12:45:50+5:30 2018-09-27T13:05:51+5:30
घर चालवण्यासाठी किंवा पैसा कमवण्यासाठी नोकरी हा पहिला पर्याय असतो. पण नोकरी मिळणे आज तितके सोपे राहिलेले नाही. प्रायव्हेट सेक्टरमध्येही नोकरी मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. अशात तुम्हीही नोकरी शोधण्यासाठी कॉर्पोरेट ऑफिसेसला फेऱ्या मारुन हैराण झाले असाल तर आम्ही तुमच्यासाठी पैसा कमवण्याचे काही पर्याय सांगणार आहोत. ही कामे करुन ना तुम्हाला बॉसची किटकिट ऐकावी लागेल ना नोकरी गमावण्याती भीती असेल. तसेच कमाईही चांगली करु शकाल.
इन्स्टाग्राम मार्केटिंग - हा कमाई करण्याचा नवा पर्याय आहे. जर तुमच्याकडे फोटो किंवा व्हिडीओच्या क्षेत्रातील चांगलं ज्ञान असेल तर तुम्ही अनेक कंपन्यांकडून इन्स्टाग्राम फीड पूल करण्याचं काम मिळवू शकता. यासाठी तुम्हाला बेसिक ट्रेनिंग घेण्याची गरज पडेल. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन कोर्सही करु शकता. www.udemy.com यावर इन्स्टाग्राम कोर्स उपलब्ध आहे. या कोर्ससाठी तुम्हाला काही फी भरावी लागेल. हे प्रशिक्षण घेतल्यावर तुम्ही घरी बसून चांगली कमाई करु शकता. (Image Credit : www.techfunnel.com)
आयटी स्पेशालिस्ट - जवळपास सर्वच कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये या लोकांची गरज असते. थोडं प्रशिक्षण घेऊनही तुमचं काम चालू शकतं. यात गुगलचा ९ महिन्याचा आयटी सपोर्ट प्रोफेशनल सर्टिफिकेट कोर्स आहे. या कोर्ससाठी तुम्हाला स्कॉलरशिपही मिळू शकते. तुम्ही https://www.uso.org/google वर यासंबंधी अधिक माहिती मिळवू शकता. (Image Credit : woman.thenest.com)
सोशल मीडिया मार्केटिंग कन्सलटंट - कंपन्यांना आपल्या प्रॉडक्टच्या प्रमोशनसाठी सोशल मीडिया मार्केटिंग मॅनेजरची गरज पडते. सोशल मीडिया आज कमाईसाठी मोठ प्लॅटफॉर्म आहे. मार्केटमध्ये सध्या अशा माणसांची फार मागणी आहे. जर तुम्हीही हे काम करु शकत असाल तर तुम्हाला चांगली संधी आहे. (Image Credit : govtech.com)
ग्राफिक डिझायनर - फुल टाइम किंवा फ्रिलान्सिंग म्हणून अशा लोकांची फार मागणी राहिलेली आहे. लिंक्ड-इव वर अशा लोकांसाठी नेहमीच संधी असतात. असे मानले जाते की, सोशल मीडियात आपलं म्हणनं साध्या आणि प्रभावी प्रकारे मांडण्यास ग्राफिक्सची मदत मिळते. याचे अनेक कोर्सेसही उपलब्ध आहेत. (Image Credit : YouTube)