संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान; पाहा सोहळ्याची आकर्षक छायाचित्रे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 01:56 PM2022-06-20T13:56:33+5:302022-06-20T13:59:56+5:30
पुणे : श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्यानिमित्ताने देहूतील देऊळवाड्यात पहाटे पासूनच भाविकांच्या रांगा लागलेल्या असून भाविकांना दर्शनबारी मधून मंदिरात दर्शनासाठी सोडले जात आहे. श्री संतुकाराम महाराज शिळा मंदिरांमध्ये देखील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. इंद्रायणी नदी काठ भाविकांनी फुलून गेला आहे. हरिनामाचा गजर करत दिंड्या भागवत धर्माची पताका घेऊन मंदिरात प्रदक्षिणेसाठी येत आहे. मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेले आहे. महाद्वार, हनुमान मंदिर, ज्या ठिकाणाहून पालखी प्रस्थान होते तो भजनी मंडप, गरुड मंदिर, आवारातील दीपमाळा, श्री राम मंदिर, श्री हरिहरेश्वर मंदिर व शिळा मंदिर या ठिकाणी केलेली फुलांची सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.